शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात जलसंपदाची ४२ पदे रिक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 17:39 IST

अनेकांकडे अतिरिक्त प्रभार : एकाच मुख्य अभियंत्यावर दोन मुख्य अभियंत्याची धुरा 

अमरावती : जलसंपदा विभागात अनेक महत्त्वाचे पदे रिक्त असून, मुख्य अभियंता जलसंपदा कार्यालय व मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) कार्यालयांतर्गत उपअभियंता संवर्गातील गट ‘अ’ व ‘ब’ संवर्गातील ४२ पदे रिक्त आहेत. या पदांचा अतिरिक्त प्रभार अनेकांकडे सोपविल्यामुळे इतर अधिकारी व तांत्रिकी कर्मचारी, अधिकाºयांच्या कामाचा ताण वाढला आहे.

काही आठवड्यांपूर्वीच जलसंपदा विभाग मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) संजय घाणेकर यांची महासंचालक महाराष्ट्र अभियांत्रिकी संघटना (मेरी) नाशिक येथे पदोन्नती मिळाल्याने त्यांचा प्रभार जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांच्याकडेच सद्यस्थिती सोपविण्यात आला आहे. रवींद्र लांडेकर यांच्या खांद्यावर आता दोन मुख्य अभियंत्याची धुरा आहे. अनुशेषांतर्गत व बिगर अनुशेषांतर्गत अनेक प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन जलसंपदा विभागावर आहे. परंतु, रिक्त पदे व जे पदे कार्यरत आहेत, त्यांच्या बदल्या झाल्यात, अशा रिक्त पदांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. परिणामी कामे प्रभावित झाली आहेत.

मुख्य अभियंता कार्यालय जलसंपदा विभाग अमरावती विभागात एकूण १०७ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ८१ पदे भरली असून २६ पदे रिक्त आहेत. मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प)  जलसंपदा विभागात एकूण ७० पदे मंजूर असून, त्यापैकी ५४ पदे भरली गेली, तर १६ महत्त्वाची पदे रिक्त आहेत. म्हणजे दोन्ही मुख्य अभियंता कार्यालयांमध्ये एकूण १७७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १३५ पदे भरलेली आहेत. त्या कारणाने प्रकल्पांचा सिंचन अनुशेष कमी करण्यासाठी एकीकडे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र रिक्त पदांचा अनुशेष वाढतच चालला आहे.  असा आहे रिक्त पदांचा तपशील मुख्य अभियंता १) प्रादेशिक कार्यालय-०२) उर्ध्व वर्धा सिंचन मंडळ अमरावती -६३) बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ- ३४) यवतमाळ पाटबंधारे प्रकल्प मंडळ -१०५) यवतमाळ सिंचन मंडळ यवतमाळ -७एकूण -२६

मुख्य अभियंता कार्यालय (विशेष प्रकल्प) १) प्रादेशिक कार्यालय -१२ अकोला सिंचन मंडळ -९३)अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ ११४ वाशिम पाटबंधारे मंडळ- १४एकूण- १६

अकोला व पुसद कार्यकारी अभियंत्याचे पदे रिक्तमुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) जलसंपदा विभाग अमरावती अंतर्गत १२ कार्यकारी अभियंत्याचे पदे मंजूर आहेत. यापैकी १० कार्यकारी अभियंता कार्यरत असून, एक कार्यकारी अभियंत्याचे पदे विदर्भ सिंचन पाटबंधारे मंडळाकडे वर्ग करण्यात आले असून तर अकोला सिंचन मंडळातील कार्यकारी अभियंत्याचे पद रिक्त आहे. तेथे लवकरच नवीन कार्यकारी अभियंता रुजू व्हावे, यासाठी प्रक्रिया सुरूअसल्याची माहिती आहे. मुख्य अभियंता कार्यालयांतर्गत यवतमाळ जिल्हतील पुसद येथीलही एका कार्यकारी अभियंत्याचे पद रिक्त आहे.

टॅग्स :Waterपाणी