शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

अचलपुरात ४११, चिखलदरा तालुक्यात २२ कोरोना रुग्ण ॲक्टिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:14 IST

अमरावती : काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग शहरासोबतच ग्रामीण भागातही गतीने वाढत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार ...

अमरावती : काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग शहरासोबतच ग्रामीण भागातही गतीने वाढत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार गत मार्चपासून ते १ मार्च २०२१ पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्यस्थितीत अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ४११, तर चिखलदरा तालुक्यात सर्वात कमी ११ रुग्ण ॲक्टिव्ह (उपचार घेत आहेत) विशेष म्हणजे जिल्ह्यातील १४ तालुक्यात आतापर्यंत ११ हजार १३७ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८ हजार ९९४ रुग्णांनी काेरोनावर मात केली. अद्याप ग्रामीण भागात २०६ जणांचे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यत म्हणजेच १ मार्च २०२१ पर्यंत ११ हजार १३७ संक्रमितांची नोंद करण्यात आली आहे. यात ८९९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १९४० रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २०६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार गत वर्षभरात अचलपूर तालुक्यात सर्वाधिक २०२३ कोरोना संक्रमित आढळून आले होते. त्यापैकी १५६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याच्या स्थितीत ४११ जण उपचार घेत असून आतापर्यंत ४९ जणांचा मूत्यू झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वरूड तालुक्यात आतापर्यंत १२७८ जण कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. यापैकी १०३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. २२४ जण उपचार घेत असून आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अंजनगाव सुर्जी तालुक्यात १०४९ कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. यातील ८२२ जणांनी कोरोनावर मात केली असून २११ जण उपचार घेत आहे. १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तिवसा तालुका संक्रमित आढळून आलेल्या मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. या तालुक्यात ८३३ कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. यापैकी ६२१रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.१९९ रूग्ण उपचार घेत असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मोशी तालुक्यात ८२६ रुग्ण आढळून आले, यातील ६२८ रुग्ण बरे झाले असून, १७९ जण उपचार घेत आहेत. १९ जणांचा मृत्यू झाला. चांदूर बाजार तालुक्यात ७४५ रुग्ण आढळले आहेत. यातील ५७३ रुग्ण बरे झाले.१५३ जण उपचार घेत असून, १९ जणांचा मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यात ७३१ रुग्ण आढळले. यापैकी ६३४ रुग्ण बरे झाले असून, ८७ जण उपचार घेत आहेत. १० जणांचा मृत्यू झाला आहे. अमरावती तालुक्यात ७२६ कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. यातील ६१४ रुग्ण बरे झाले असून ९६ जण उपचार घेत आहेत. १९ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यात ६४९ रूग्ण आढळून आले आहेत. यातील ५९१ जण बरे झाले असून ५० रुग्ण उपचार घेत आहेत. ८ जणांचा मृत्यू झाला आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात ५४८ कोरोना संक्रमित आढळले आहेत. यातील ४८३ रूग्ण बरे झाले, तर ५६ जण उपचार घेत आहेत व ९ जणांचा मृत्यू झाला आहे. धारणी तालुक्यात ४९२ संक्रमित आढळले आहेत. यातील ३८७ जण बरे झाले असून १०३ जण उपचार घेत आहेत. २ जणांचा मृत्यू झाला आहे. भातकुली तालुक्यात ३८९ कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. यातील ३१२ जण बरे झाले आहेत. ७० जण उपचार घेत आहे. ७ जणांचा मृत्यू झालेला आहे. चिखलदरा तालुक्यात १२० कोरोना संक्रमित आढळले होते. यापैकी १०९ रूग्ण बरे झालेले आहेत. ११ जण उपचार घेत आहेत. या तालुक्यात एकही कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याची नोंद आहे.