शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

राज्यात आठ महिन्यांत ४०६ एसीबी ट्रॅप; लाचखोरीत पुणे परिक्षेत्र अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 20:49 IST

लाचखोरीत पुणे परिक्षेत्र अव्वलस्थानी आहे. येथे १०० सापळ्यांमध्ये १४१ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देअपसंपदेचे नऊ, अन्य भ्रष्टाचाराचे २० गुन्हे

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात गत आठ महिन्यांत ४०६ सापळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी झाले. लॉकडाऊन काळात अनेक लाचखोरांना एसबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले. या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत सापळ्यांमध्ये सरासरी ५० टक्कयांनी कमी आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. अपसंपदेचे नऊ, तर अन्य भ्रष्टाचाराचे २० गुन्हे दाखल झाले असून, १ जानेवारी ते २ सप्टेंबरदरम्यान ४३५ गुन्हे एसीबीने दाखल केले आहेत.

लाचखोरीत पुणे परिक्षेत्र अव्वलस्थानी आहे. येथे १०० सापळ्यांमध्ये १४१ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. आठ महिन्यांत सर्वात कमी १० सापळे हे मुंबई परिक्षेत्रात यशस्वी झाले. २०१९ मध्ये आठ महिन्यांत ८६६ सापळे यशस्वी झाले तर अपसंपदेचे २० व अन्य भ्रष्टाचाराचे पाच असे एकूण ८९१ गुन्हे नोंदविण्यात आले होते. गतवर्षीच्या तुलनेत लॉकडाऊन काळात अनेक शासकीय कार्यालये बंद होती. नागरिकांचाही फारसा कार्यालयात वावर नसल्याने पाच महिन्यांत गुन्ह्यांमध्ये घट झाल्याच्या आकडेवारीवरून दिसून येते. ४०६ ट्रॅपमध्ये एकूण ९८ लाख ८४ हजार २२० रुपयाची लाच रक्कम अधिकाºयांनी जप्त केली.विभागनिहाय सापळेपरिक्षेत्र         गुन्हे      आरोपीमुंबई            १०             १६ठाणे             २८           ४३पुणे             १००          १४१नाशिक         ५९          ७४नागपूर           ५७         ७४अमरावती       ५३         ७०औरंगाबाद      ५१         ७२नांदेड              ४८        ६६एकूण            ४०६        ५५५महसूल विभाग अव्वलगत आठ महिन्यांत ४०६ एसीबी ट्रॅप यशस्वी झाले. लाचखोरीत नेहमीप्रमाणे महसूल विभाग अव्वल स्थानी आहे. १०३ सापळ्यांत अधिकारी, कर्मचारी अडकले. दुसरा क्रमांक हा पोलीस प्रशासनाचा असून, ९६ सापळ्यांमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी अडकले. महावितरणचे २१, महानगररपालिका १६, नगरपरिषद १४, पंचायत समिती ३७, वनविभाग १८,आरोग्य विभाग १३, सहकार व पणन विभाग १२, शिक्षण विभाग १४, कृषी विभाग ११, तर अन्य अनेक विभागांचा सापळ्यांमध्ये समावेश आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग