शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

खोदकामात मिळाली तांब्याची 404 नाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 2:42 AM

दाम्पत्याचा पळून जाण्याचा प्रयत्न, महसूल प्रशासनाने घेतली नोंद

धारणी (जि. अमरावती) : तालुक्यातील रोहणीखेडा शिवारात एका शेतात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चर खोदण्याचे काम सुरू असताना, एका मजुराला तांब्याची नाणी सापडली. ती नाणी महसूल व पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतली असून, पुढील कारवाईकरिता ती जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहेत.

रोहणीखेडा शिवारात बुढा तोट्या दहीकर यांचे टेकडीवर शेत आहे. त्या शेताच्या बांधावर चर खोदकाम सुरू होते. त्या कामाकरिता गावातील १८० मजुरांची उपस्थिती होती. मजूर रघुनाथ सोमा जावरकर व त्याची पत्नी खोदकाम करत असताना, त्यांना मातीच्या मडक्यातून मातीने माखलेली तांब्याची नाणी मिळाली. त्या दोघांनी ती नाणी कोणालाही माहिती होऊ न देता पिशवीमध्ये भरली व काम संपल्यावर ते दोघेही घराकडे पळायला लागले. अन्य मजुरांनी दाम्पत्याला पिशवीत काय नेत आहे, हे वारंवार विचारले. पण, त्यांनी सांगण्यास नकार दिला. त्यातीलच एका मजुराला संशय आल्याने त्याने आणखी १५ मजुरांना घेऊन पुन्हा खोदकाम सुरू केले. तेथे त्याला एक नाणे मिळाले. त्यावरून रघुनाथला नाणी मिळाल्याची कल्पना मजुरांना आली. याबाबत महसूल प्रशासनाला कळविण्यात आले.

पिशवीत ४०३ नाणीघटनास्थळावर नायब तहसीलदार अनिल नाडेकर व सराफ धुर्वे यांनी भेट देऊन एक नाणे ताब्यात घेतले आणि गावात जाऊन रघुनाथचा शोध घेतला. रघुनाथने ती नाण्याची पिशवी छपराच्या लाकडाला बांधून ठेवली होती. त्यातील नाण्याचे मोजमाप केले असता, ती ४०३ नाणी भरली. एकूण ४०४ नाणी महसूल प्रशासनाने आयपीएस तथा ठाणेदार निकेतन कदम यांच्याकडे पोलीस कस्टडीमध्ये ठेवली आहेत.नाण्यांवर उर्दू लिपीजमिनीत असल्याने नाण्यांवर मातीचा घट्ट थर आहे. त्यावर उर्दू अक्षरात लिखाण केले असून, ती मुघलकालीन असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ती नाणी केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपविली जातील.

टॅग्स :AmravatiअमरावतीRupee Bankरुपी बँक