शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

४०० शेतकऱ्यांची ‘महाबीज’कडून फसवणूक

By admin | Updated: November 22, 2014 00:00 IST

पूर्णानगर परिसरातील ४०० शेतकऱ्यांनी महाबीजचे ३३५ जातींचे वाण पेरले, हे बियाणे उगवलेच नाहीत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या, पाहणी झाली, अहवालात बियाणे वांझोटे निघाले.

गजानन मोहोड अमरावतीपूर्णानगर परिसरातील ४०० शेतकऱ्यांनी महाबीजचे ३३५ जातींचे वाण पेरले, हे बियाणे उगवलेच नाहीत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या, पाहणी झाली, अहवालात बियाणे वांझोटे निघाले. मात्र, महाबीजने येथील एकाही शेतकऱ्याला बियाणे किंवा रोख स्वरुपात परतावा दिला नाही. त्यामुळे ‘महाबीज’ने फसवणूक केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. खरीप-२०१४ च्या हंगामात सोयाबीन उगवले नसल्याच्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्यात. तक्रार निवारण पथकाव्दारा या क्षेत्राची पाहणी करण्यात आली. बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यापैकी २७० नमुन्यांमध्ये उगवणशक्तीचा अभाव असल्याचा अहवाल आहे. पूर्णानगर, वातोंडा, येलकी, अंचलवाडी, मिर्झापूर, वाकी, सावलपूर, उमरटेक गावातील शेतकऱ्यांनी पूर्णानगर येथील कृषीसेवा केंद्रामधून महाबीजचे बियाणे खरेदी केले होते. परंतु ते बियाणे वांझोटे निघाले. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्यास त्यासाठी महाबीज जबाबदार असेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दोन हजार एकरामध्ये नुकसानअमरावती : हे बियाणे वांझोटे निघाल्याचे शेतकऱ्यांचा घात झाला. पथक पाहनीला येणार म्हणून कित्येक दिवस शेत पेरणीविना राहिले. कपनीव्दारा बियाणे देण्यात येईल. या आशेवर पाणी फेरल्या गेले. महाबीजसह ईतर कंपन्यांची बियाणे किंवा रोख स्वरुपात देण्यात आलेला नाही. दुपार पेरणीला बियाणे नाही व उशीर झाल्यामुळे या शेतकऱ्यांची किमान २ हजारावर एकर क्षेत्रात खरीप पिकाचे नुकसान झाले. वांझोट्या बियाण्यांची विक्री करणाऱ्या महाबीजसह ईतर कंपन्यावर कारवाई करावी, नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी पूर्णानगर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.२८ शेतकऱ्यांना परतावा, ५० शेतकऱ्यांना भरपाईखरीप हंगाम २०१४ मध्ये बियाणे उगवन न झालेल्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्यात. या प्रकरणांची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीव्दारा तपासणी करण्यात आली. यामध्ये २८ शेतकऱ्यांना ४६ क्विंटल बियाणे ५० शेतकऱ्यांना ७ लाख ३५ हजारांची मदत देण्यात आली. सर्वाधिक नुकसान झालेल्या पूर्णानगर परिसरातील एकाही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. परवाने रद्द झालेले कृषी केंद्र सुरूचसोयाबीन बियाण्यांची उगवनशक्ती नसलेले बियाणे विकण्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन पूर्णानगर येथील सुमित कृषी केंद्र व यश कृषी सेवा केंद्र यांचे बियाणे विक्रीचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. मात्र हे दोन्ही दुकान सुरू असल्याचा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. याशिवाय कृषी विभागाशी संपर्क साधला असता, त्या दुकानदारांचे किटकनाशक व खते विक्रीचे परवाने सुरू असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार याच विक्रेत्यांनी परिवारातील अन्य व्यक्तिंच्या नावे परवान्यासाठी अर्ज दाखल केला आहे. २१ प्रकरणात केसेस दाखलउगवनशक्ती नसलेले बियाण्यांच्या तक्रारी संदर्भात शेतकऱ्यांना अधिकाधिक मोबदला कंपनीकडून मिळावा असा, प्रयत्न कृषी विभाग करतो, असे कृषी विकास अधिकारी वरुन देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)