शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

डेक्स-बेंच खरेदीत ४० लाखांची अनियमितता

By admin | Updated: April 11, 2016 00:05 IST

शहरातील उद्यान विकास आणि मुंबईच्या हायप्रोफाईल ‘स्टडी टूर’मध्ये लाखांचा घोळ घातला गेला. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतील घोळ एवढ्यावरच थांबला नाही, ......

कंत्राटदाराला अभय : अभिलेखाशिवाय नोंदविला खर्चप्रदीप भाकरे अमरावतीशहरातील उद्यान विकास आणि मुंबईच्या हायप्रोफाईल ‘स्टडी टूर’मध्ये लाखांचा घोळ घातला गेला. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतील घोळ एवढ्यावरच थांबला नाही, तर शाळेसाठी करण्यात आलेल्या डेक्स-बेंच खरेदीत तब्बल ४० लाख रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याची बाब पुढे आली. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत समुदाय विकास समितीच्या स्तरावरून महापालिकेच्या अखत्यारितील प्राथमिक शाळा व उच्च प्राथमिक शाळांना डेक्स-बेंच पुरवायचे होते. यासंबंधी ‘वनश्री मार्केटिंग’ या कंपनीशी करार करण्यात आला. साहित्य खरेदीत घोळया संपूर्ण साहित्य खरेदीत घोळ घालण्यात आला. वनश्री मार्केटिंगसोबत झालेल्या करारनाम्याची मुळप्रत, दरकराराची मूळ प्रत, साठा नोंदवह्या तसेच ज्या शाळांना साहित्याचा पुरवठा करण्यात आला त्यांच्या साठा नोंदवह्या, पुरवठा दराच्या डिलिव्हरी मेमो वारंवार मागूनही उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे ३९ लक्ष ५० हजारांचा हा खर्च डेक्स-बेंच खरेदीवर झाला की नाही, हाच मूळ प्रश्न आहे. लेखापरीक्षकांना ठेंगाडेक्सबेंच खरेदीसंदर्भातील अभिलेखे (रेकॉर्ड) उपलब्ध करुन देण्याबाबत मुख्य लेखपरीक्षकांनी १४ मार्च २०१४, २१ मार्च २०१४ व २८ मार्च २०१६ या अर्धशासकीय पत्रान्वये वारंवार कळविले. तथापि अभिलेखे उपलब्ध करून देण्यात आली नाही. अभिलेखे उपलब्ध करून दिल्यास घोळ बाहेर येईल, अशी भीती असल्याने योजनाप्रमुखांकडून लेखापरीक्षकांना वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्या.