शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

३७४ गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:10 IST

गतवर्षी सरासरीपेक्षा ३३ टक्के पाऊस कमी झाल्याचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. सद्यस्थितीत ३७४ गावांना कोरड लागली आहे.

ठळक मुद्देअपुऱ्या पावसाचा परिणाम : ३८६ उपाययोजना, १३.६० कोटींची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा ३३ टक्के पाऊस कमी झाल्याचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. सद्यस्थितीत ३७४ गावांना कोरड लागली आहे. यासाठी शासनाने ३८६ उपाययोजनांना प्रशासनाला मंजुरी दिलेली आहे. यावर १३ कोटी ६० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे.जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ तीन टप्प्यातील कृती आराखड्यात १,४२८ गावांसाठी १,७४५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या होत्या. यासाठी १७ कोटी ९९ लाख ९६ हजारांच्या निधीची आवश्कता आहे. उन्हाळ्याच्या भीषणतेच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाने ३७४ गावांतील उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. यामध्ये पाणीटंचाई निवारणार्थ नवीन ७० विंधन विहिरी व ४१ कुपनलिका अशा एकूण ११ कामांना मंजुरात देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारा नवीन ४५ विंधन विहिरी व १९ कुपनलिका अशी एकूण ६४ कामे पूर्ण केलेली आहेत, तर ४७ कामे प्रगतीपथावर आहेत.जिल्हा परिषदेअंतर्गत १०१ नळ योजनांच्या विशेष दुरूस्ती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील ७७ अशा एकूण १७८ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. जिल्हा परिषदेच्या ३२ नळ योजनांतर्गत विशेष दुरूस्तीच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. उर्वरित कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सांगितले.तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या ४८ कामांना प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली आहे. ९ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहे व उर्वरित कामे निविदा प्रक्रियेत आहे. सद्यस्थितीत ४३ गावांमध्ये ४९ खासगी विहीरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा होत नसला तरी सोमवारपासून चिखलदरा तालुक्यात पस्तलाई व भांद्री या गावांसाठी दोन टँकर सुरू करण्याचे आदेशित आहे.या उपाय योजनांना मंजुरी

सद्यस्थितीत ३७४ गावातील २८६ उपाययोजनांना मंजुरात देण्यात आली . यामध्ये १०५ गावात १११ विंधन विहीरी व कुपनलिका करण्यात येणार आहे . यावर १.०९ कोटी, १७८ गावात १७८ नळ योजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येईल यासाठी ९.८० कोटी, ४८ गावात ४८ तात्पुरत्या पुरक नळ योजना यावर २.४१ कोटी, ४३ गावात ४९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करणायत आले यावर ३० लाख, असे १३.६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.१३९ गावात १५१ उपाययोजना सुरूसद्यस्थितीत १३९ गावात १५९ उपाययोजना सुरू आहेत. यावर ३.१९ कोटींचा खर्च होणार आहे. यामध्ये ४१ गावार ४७ विंधन विहीरी, कुपनलिकांची कामे सुरू आहेत, यासाठी ५१ लाख, ३२ गावात ३२ नळ योजनांची विशेष दुरूस्ती सुरू आहे,यासाठी १.२३ कोटी, २३ गावात तात्पुरत्या पुरक नळ योजनांची कामे सुरू आहेत, यासाठी १.१५ कोटी, ४३ गावात ४९ खासगी विहीरींचे अधिग्रहन करण्यात आलेले आहे. यासाठी ३० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे.