शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

३७ गावांना अधिग्रहण, टँकरचे पाणी

By admin | Updated: April 15, 2016 00:42 IST

एम़जी़ मोमीन ल्ल जळकोट तालुक्यात ४७ पैकी ३७ गावांत सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ ही टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने १४ गावे व ७ वाड्यांना

टंचाईची तीव्रता वाढली : घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंतीएम़जी़ मोमीन ल्ल जळकोट तालुक्यात ४७ पैकी ३७ गावांत सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ ही टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने १४ गावे व ७ वाड्यांना २० टँकरने तसेच या गावांसह अन्य ३७ गावांना ५१ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ यंदा १९७२ पेक्षा अधिक कठीण परिस्थिती झाली आहे़जळकोट तालुक्यात ४७ गावे आहेत़ जळकोट शहर वगळले तर सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडत आहेत़ त्यामुळे पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ पाणीटंचाई दूर करण्यासाठी माळहिप्परगा तलावात एक सार्वजनिक विहिर घेऊन तेथून टँकरने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश पाणीपुरवठा विभागाला १० मार्चला देण्यात आले होते़ परंतु, अद्यापही त्याचे अंदाजपत्रक तयार झाले नसल्याने ते मंजुरीसाठी पाठविण्यात आले नसल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील यांनी दिली़ जगळपूर पंचायत समिती गणातील अधिग्रहण करण्यात आलेले जलस्त्रोत आटल्याने तेथे सुरु असलेले टँकर पाण्याअभावी जागवेर उभे आहेत़ तसेच जगळपूर, हावरगा, डोमगाव येथील टँकरलाही पाणी मिळेनासे झाले आहे़ होकर्णा, उमरदरा, शेलदरा, सिंदगी या गावांना नांदेड जिल्ह्यातील नंदनशिवणी तलावातून पाणीपुरवठा केला जात आहे़ याशिवाय, तालुक्यातील करंजी, सोनवळा, बेळसांगवी, बोरगाव आदी तांड्यावर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे़ तालुक्यातील पशूधन संख्या ५५ हजार आहे़ शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळल्याने कडब्याचे उत्पन्न घटले आहे़ यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अत्यल्प प्रमाणात ज्वारीचा पेरा झाला होता़ त्यामुळे कडब्याची पेंढी २३ रूपयांना विक्री केली जात आहे़ त्यामुळे पशूपालकांना चाऱ्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे़ तसेच तालुक्यात मजूरांची संख्या २५ हजार आहे़ सध्या मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर गाव सोडून जाण्याची पाळी येऊन ठेपली आहे़ काही मजुरांनी मोठ्या शहरांकडे धाव घेतली आहे़ मजुरांना काम, नागरिकांना पाणी व जनावरांना चारा देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मन्मथ किडे, सरपंच बालाजी आगलावे, बालाजी बारमळे, मारोती पांडे, संतोष तिडके, दत्ता पवार, बाबुराव जाधव, रामराव राठोड, शांताबाई अदावळे, अर्जुन पाटील आदींनी केली आहे़चारा छावण्यांसाठी ; संस्थांचा पुढाकार हवा़़़पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे़ आवश्यक तिथे टँकर मंजूर केले जात आहेत़ पशूधनांच्या चाऱ्यासाठी छावण्या सुरु करण्याकरिता सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तहसीलदार शिवनंदा लंगडापूरे, गटविकास अधिकारी अमिता गावडे यांनी केले आहे़ नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात कुठलीही हयगय केली जाणार नाही, असे उपजिल्हाधिकारी डॉ़ विकास खरात यांनी सांगितले़दुष्काळामुळे मागेल त्याला काम, आवश्यक तिथे टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत़ उदगीर व जळकोट तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन तात्काळ परिस्थितीची माहिती घेऊन उपाययोजना केल्या जातील, असे आमदार सुधाकर भालेराव यांनी सांगितले़