शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

२१ ‘एसटीपी’वर ३६ शहरांची मदार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 19:06 IST

मैल्याचे आदान-प्रदान बंधनकारक : शतप्रतिशत व्यवस्थापनावर भर

अमरावती : शहरांमधील मैलाचे १०० टक्के व्यवस्थापन करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे राज्यात पूर्णत: अस्तिवात असलेल्या २१ मलनि:सारण प्रक्रिया केंद्र अर्थात एसटीपींना ३६ शहरांतील मलनि:सारणाचा भार सोसावा लागणार आहे. ज्या ३६ शहरांत एसटीपी अस्तिवात नाही, त्या शहरांनी एसटीपी असलेल्या शहरांमध्ये मैला पाठविणे व त्या शहरांनी हा मैला स्वीकारणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ज्या शहरांमध्ये एसटीपी अस्तिवात नाही, परंतु, ती शहरे एसटीपी असलेल्या शहरांच्या २० किलोमीटर परिघात आहेत, त्या शहरांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मैला स्वीकारणाऱया शहरांना कोणतेही अतिरिक्त शुल्क घेता येणार नाही. याप्रकारे एसटीपी नसलेल्या शहरांमधील मैलाचे १०० टक्के व्यवस्थापन करून त्या मैलावर प्रक्रिया करण्याचे निर्देश नगरविकास विभागांनी ३६ नगरपालिका, महापालिका व नगरपंचायत प्रशासनाला दिले आहे. 

या ठिकाणी आहेत एसटीपीअमरावती, औरंगाबाद, नवी मुंबई, कोल्हापूर, नागपूर, नांदेड वाघाडा, नाशिक, पिंपरी चिंचवड, सांगली, चंद्रपूर महापालिकेसह शिरवडे-वरवडे, इचलकरंजी, कराड, लोणावळा, पाचगणी, शेगाव, शिर्डी, कुळगाव - बदलापूर, सासवड, वाशिम व अंबरनाथ नगरपरिषदेत एसटीपी आहेत. या महापालिका व नगरपालिकांच्या २० किलोमीटर परिघात असलेल्या ३६ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मैला या २१ शहरांतील एसटीपीवर पाठवावा लागणार आहे.

या ३६ शहरांना होणार लाभ भातकुली, खुल्दाबाद, उरण,पन्हाळा, वडगाव कसबा, वाडी, वानाडोंगरी, महादुला, कामठी, कन्हान पिंपरी, हिंगणा, अर्धापूर, मुदखेड, भगूर, आयंदी, चाकण, तळेगाव, जयसिंगपूर, तासगाव, बल्लारपूर, राजुरा, सिंदखेड, कुरंदवाड, कडेगाव, खोपोली, खालापूर, मेढा, खामगाव, बाळापूर, कोपरगाव, राहता, कर्जत, मुरबाड, जेजुरी, मालेगाव, उल्हासनगर या शहरांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतागृहांचा मैला एसटीपी असलेल्या २१ शहरांमधील नजीकच्या शहरांत पाठवावा लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी