शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

नादुरूस्त एसटी बसचा ३५ प्रवाशांनी अनुभवला थरार

By admin | Updated: April 17, 2016 00:09 IST

रस्त्याने धावताना अचानक एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याची घटना शनिवारी सकाळी ७ वाजता लाखनवाडी-परतवाडा मार्गावर कविठा गावानजीक घडली.

ब्रेक फेल : एकाच क्रमांकाच्या दोन बसमुळे घोळनरेंद्र जावरे परतवाडारस्त्याने धावताना अचानक एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याची घटना शनिवारी सकाळी ७ वाजता लाखनवाडी-परतवाडा मार्गावर कविठा गावानजीक घडली. चालकाच्या ही बाब लक्षात येताच महत्प्रयासाने बस थांबविली आणि अंगावर शहारे आणणारा प्रवाशांचा जिवाचा थरकाप उडविणारा प्रसंग थांबला. परतवाडा-लाखनवाडीसाठी पहाटे ६ वाजता एम.एच. ०६ एस ८०३९ क्रमांकाची बस फेरीचालक रावेकर व वाहक जयश्री हिवराळे घेऊन गेले. ही बस ७ वाजता कविठा येथे पोहचत असताना अचानक बिघाड होऊन ब्रेक निकामी झाले. बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह जवळपास ३५ प्रवासी होते. प्रसंगी एकच हल्लकोळ माजला. मात्र पहाटे रस्त्यावर कुणीच नसल्याने हा आवाज व्यर्थ गेला. थांबविण्याच्या प्रयत्नात चालक रावेकर यांनी कविठा गावानजीकच्या ‘बदुर्डी’ नदीच्या घाट रस्त्यावर बस आणली आणि वेग नियंत्रित केला. रस्त्यावरील खताच्या पडलेल्या गंजीमुळे अजूनच भर पडली आणि बस थांबली. जिवाचा थरकाप उडविणारा प्रसंग पाहता प्रवाशांनी विना विलंब बसमधून बाहेर निघण्यासाठी एकच गर्दी केली आणि सुटकेचा श्वास टाकला. परतवाडा बस आगारात एमएच ०६ एस ८०३९ क्रमांक आणि एमएच ०६ एन ८०३९ अश्या सारख्या क्रमांकाच्या दोन बसगाड्या आहेत, दोन्हीच्या क्रमांकात एस आणि एन चे अंतर आहे. संबंधित चालकाला ‘एन’ सिरीज असलेली बसगाडी नेण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र सारख्या क्रमांकाने चालकाने ‘एस’ सिरीज असलेली बस नेली. ती बसगाडी नादुरुस्त होती. दुरूस्तीसाठी तिला आगारातील यांत्रिक विभागालगत ठेवण्यात आले होते. मात्र झालेली नजरचूक प्रवाशांच्या जिवावर उठणारी होती. ८० बस ४२ यांत्रिकजिल्ह्यात सर्वात मोठे आगार परतवाड्याचे आहे. मात्र हे आगर पाच वर्षांपासून ‘भंगार बसचे’ आगार म्हणून ओळखल्या जाते. येथे एकूण ८० बसगाड्या असून दुरुस्तीसाठी केवळ ४२ यांत्रिक कारागीर आहेत. अधिक पदे रिक्त असल्याने नादुरुस्त गाड्यांची कामे वेळेवर पूर्ण होत नाही. परिणामी आगारातून दिवसभर ७१ बसफेऱ्या पूर्ण करण्यासाठी नादुरुस्त बसगाड्या नेण्याची वेळ चालकांवर आली आहे. आगार प्रमुख लक्ष्मीनारायण भुतडा सुटीवर आहेत. त्यामुळे हे आगार रामभरोसे आहे.