अमरावती जिह्यात सापांच्या ३४ प्रजाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:14 AM2021-09-11T04:14:25+5:302021-09-11T04:14:25+5:30

अमरावतीत सात प्रकारचे विषारी साप आढळतात. त्यात नाग, घोणस (रसर वायपर), मण्यार, बांबू पिटवायपर (मेळघाट), स्वस्केलड वापयर ...

34 species of snakes in Amravati district | अमरावती जिह्यात सापांच्या ३४ प्रजाती

अमरावती जिह्यात सापांच्या ३४ प्रजाती

Next

अमरावतीत सात प्रकारचे विषारी साप आढळतात. त्यात नाग, घोणस (रसर वायपर), मण्यार, बांबू पिटवायपर (मेळघाट), स्वस्केलड वापयर (दुर्मीळ) वाल सिंध मण्यार (दुर्मीळ), स्लेडर कोराल (दुर्लभ) हे साप आढळले आहेत.

बॉक्स

साप घरी दिसल्यास हे करावे

साप घरी दिसल्यास घरातील सदस्यांनी दूर सुरक्षित अंतरावर रहावे. सर्पमित्रांशी संपर्क करावा, सर्पमित्र पोहचेपर्यँत त्यावर लक्ष द्यावे, सापाला छेडण्याचा प्रयत्न करू नये, साप दिसल्यास गर्दी करू नये, साप पकडण्याचा विनाप्रशिक्षण प्रयत्न करू नये. असावेली सर्पमित्र शुभम पाचारे ९८३४६३७७९५, अभिषेक ठाकरे ९३०७७१५३५८, धीरज भोयर. ७४९८४१७९५०, गौरव पारिसे ७८२१८६७९३३, सूरज अमझरे ८०८०७२९७००, श्याम लुंगे ७४९८९६९७१७, हेमंत ठाकरे ७४१४९२४८७०, सौरभ घडेकर ७९८३८५५९८७ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

सर्पदंश झाल्यास हे करावे

सर्पदंश झाल्यास त्या जाोवर प्रथम साबण आणि पाण्याने धुवावे. जिथे दंश झाला तिथे एखादी सरळ लाकडी पट्टी घेऊन ती जागा स्थिर ठेवावी. कसून बांधलेला धागा किंवा ब्लेट काढून टाकावे, सर्पदंश झाल्यास दवाखाण्यात जाण्याआदी तिथे औषध उपलब्ध आहे की. नाही याची माहिती घ्यावी, वेळ गमवल्यास धोखा वाढू शकतो, दंश झालेला व्यक्तीला धीर द्यावा, अशी माहिती मोर्शी युनिटचे सर्पमित्र शुभम पाचारे यांनी सांगितले.

मोर्शी तालुक्यातील कार्स मोर्शी युनिटचे सर्पमित्र

Web Title: 34 species of snakes in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.