शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा बहिरमच्या पंचशील आदिवासी आश्रमशाळेतील 34 मुलींना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2022 23:39 IST

सर्व बाधित मुलींना उलटी, पातळ शौचास, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास शुक्रवारी सायंकाळी जेवणानंतर जाणवायला लागला. सध्या या सर्व मुलींची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर आहे. यातील आठ मुलींना शनिवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. पंचशील आदिवासी आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंत ५९७ विद्यार्थी आहेत. या सर्व मुला-मुलींनी शुक्रवारी सायंकाळी सोबतच जेवण घेतले. मुलांना कुठलाही त्रास जाणवला नाही, मात्र पहिली ते बारावीच्या निवडक ३४ विद्यार्थिनींनाच हा त्रास जाणवला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : कारंजा बहिरम पंचशील आदिवासी आश्रमशाळेतील ३४ मुलींना शुक्रवारी सायंकाळी विषबाधा झाली. ही विषबाधा नेमकी कशातून झाली, याची अजूनपर्यंत स्पष्टता झालेली नाही. बाधित ३४ मुलींना शिक्षकांनी औषधोपचाराकरिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्रीलाच दाखल केले.डॉक्टरांनी यातील २९ मुलींना उपजिल्हा रुग्णालयात भरती करून घेतले. एका मुलीला उपचारार्थ अमरावतीला पाठविले, तर चार मुलींना औषधोपचारानंतर लागलीच सुटी दिली. या सर्व बाधित मुलींना उलटी, पातळ शौचास, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास शुक्रवारी सायंकाळी जेवणानंतर जाणवायला लागला. सध्या या सर्व मुलींची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर आहे. यातील आठ मुलींना शनिवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. पंचशील आदिवासी आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंत ५९७ विद्यार्थी आहेत. या सर्व मुला-मुलींनी शुक्रवारी सायंकाळी सोबतच जेवण घेतले. मुलांना कुठलाही त्रास जाणवला नाही, मात्र पहिली ते बारावीच्या निवडक ३४ विद्यार्थिनींनाच हा त्रास जाणवला. त्यामुळे नेमकी ही विषबाधा कशातून झाली, याविषयी अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.शिरजगाव पोलिसांनी नोंदविले बयाणकारंजा बहिरम येथील पंचशील आदिवासी आश्रमशाळेतील मुलींना विषबाधा झाल्यानंतर शिरजगाव पोलिसांनी आश्रमशाळेतील अन्न व पाण्याचे नमुने ताब्यात घेतले आहेत. हे नमुने पोलीस तपासणीकरिता पाठविणार आहेत. दरम्यान, शिरजगाव पोलिसांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल बाधित मुलींचे बयाण नोंदविले आहे.

एसडीओंकडून जिल्हाधिकाऱ्यांना माहितीपंचशील आदिवासी आश्रम शाळेतील मुलींना झालेल्या विषबाधा प्रकरणाची माहिती अचलपूरचे एसडीओ संदीप कुमार अपार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. तर नायब तहसीलदार अक्षय मांडवे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विषबाधा प्रकरणाची माहिती जाणून घेतली.अतिरिक्त वाॅर्ड सज्ज औषधोपचाराकरिता दाखल बाधित मुलींचे एका स्वतंत्र वाॅर्डात व्यवस्था करण्यात आली आहे. यादरम्यान बाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास येणाऱ्या विद्यार्थ्याला योग्य तो औषधोपचार तत्काळ मिळावा म्हणून एक अन्य वाॅर्ड अतिरिक्त बेडसह सज्ज ठेवण्यात आला असल्याची माहिती अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र ढोले यांनी सांगितले. विषबाधेचे नेमके कारण सध्या सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षक रुग्णालयातपंचशील आदिवासी आश्रमशाळेतील बाधित विद्यार्थिनींच्या आरोग्याबाबत शाळेतील शिक्षकही काळजी घेत आहेत. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयासहजिल्हा रुग्णालयात वसतिगृह अधीक्षकासह शाळेतील शिक्षक रुग्णालयात उपस्थित आहेत.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीHealthआरोग्य