शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जाफरजीन प्लाॅटमधून ३१७५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त; महापालिका, सीआयूची संयुक्त कार्यवाही

By प्रदीप भाकरे | Updated: August 10, 2023 17:10 IST

२५ हजारांचा दंड, एफआयआरही

अमरावती : स्थानिक जाफरजिन प्लाॅटमधील एका गोडाऊनमधून तब्बल ३१७५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. शहर पोलिसांचे क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट व महापालिकेच्या स्वच्छता विभागाने गुरूवारी ही संयुक्त कार्यवाही केली. संतोष मंगलानी (रा. रामपुरी कॅम्प) याच्याकडे तिसऱ्यांदा प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्याने त्याला महापालिकेकडून २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर, त्याच्याविरूध्द फौजदारी तक्रार देखील दाखल करण्यात येणार आहे.

शहर पोलिसांचे सीआययू १० ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करत असताना एकाने जाफरजिन प्लाॅटमधील एका गोडाऊनमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. ती माहिती महापालिकेच्या स्वच्छता विभागासह राजापेठ झोनला देण्यात आली. पोलीस व महापालिकेच्या स्वास्थ निरिक्षकांनी त्या गोडाऊनची तपासणी केली असता, आरोपी संतोष मंगलानी याच्या ताब्यातून एकुण १५.८७ लाख रुपये किमतीच्या ३ टन १७५ किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करण्यात आले. त्या प्रतिबंधित पिशव्या १२७ पोत्यांमध्ये साठविल्या होत्या. तो संपुर्ण जप्त माल स्वच्छता विभागाकडे सुपुर्द करण्यात आला.

तिसऱ्यांदा सापडला मंगलानी विशेष म्हणजे यापुर्वी दोनदा मंगलानी याच्याकडून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. तो आता तिसऱ्यांदा सापडल्यामुळे महापालिकेकडून २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास फौजदारी देखील करता येते. त्यामुळे महापालिकेकडून शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात येईल. पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, एसीपी प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनात सिआययूमधील सहायक पोलीस निरिक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरिक्षक गजानन राजमल्लू यांच्यासह महापालिकेच्या स्वच्छता विभाग प्रमुख डॉ. सीमा नैताम, राजापेठ झोनचे सहायक आयुक्त भुषण पुसतकर यांच्या मार्गदर्शनात स्वास्थ निरिक्षक प्रशांत गावनेर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPlastic banप्लॅस्टिक बंदीAmravatiअमरावती