शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीतील स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 31 डिसेंबरची 'डेडलाइन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 16:59 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची देखभाल दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी 31 डिसेंबरची 'डेडलाइन' देण्यात आली आहे.

अमरावती : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची देखभाल दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी 31 डिसेंबरची 'डेडलाइन' देण्यात आली आहे. 1  नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेतील कामे पूर्ण केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी स्वत: पाहणी करावी तथा त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. एकीकडे राज्यातील संपूर्ण नागरी भाग हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली.

त्याचवेळी शहरांमधील सार्वजनिक, सामुदायिक शौचालयांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्या अनुषंगाने हगणदारीमुक्तीचा दर्जा कायम राखून त्यामध्ये सातत्य राखण्यासाठी राज्यातील सर्व शहरांमध्ये १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सामुदायिक, सार्वजनिक शौचालय देखभाल, दुरुस्ती, व्यवस्थापन व सुशोभिकरण मोहीम राबविली जात आहे. महापालिका आयुक्त आणि मुख्याधिका-यांकडे या मोहिमेच्या यशस्वीतेची जबाबदारी देण्यात आली आहे.

त्यात १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान शहरातील सामुदायिक सार्वजनिक शौचालयांची सद्यस्थितीची पाहणी करण्याचे निर्देश होते. करारनामा स्वच्छतागृहांच्या जिओ टॅग छायाचित्रे काढण्याचे निर्देशही होते. ६ ते १२ नोव्हेंबरदरम्यान पाहणीत आढळलेल्या स्थितीच्या अनुषंगाने दुरुस्तीसाठी आराखडे व अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानंतर १३ ते २२ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिका-यांनी अंदाजपत्रकास मान्यता देणे बंधनकारक आहे.

२३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान स्वच्छतागृहांच्या आवश्यक दुरुस्ती व व्यवस्थापनासाठी निविदा प्रक्रिया केली जाईल. १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पात्र कंत्राटदारांना वर्कआॅर्डर देऊन त्यांचेकडून दुरुस्तीचे कामे करून घेण्यात येणार आहेत. सामुदायिक, सार्वजनिक शौचालयांची नियमितपणे देखभाल दुरुस्तीसाठी शहरातील महिला बचतगटांना प्राधान्याने विचार करावा, अशा सूचना नगरविकासने दिल्या आहेत. याशिवाय सामुदायिक सार्वजनिक शौचालयांच्या एकूण सिटपैकी किमान एक सिट दिव्यांगांना वापरण्यासाठी त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील. 

'पीएम-सीएम'चा फ्लॅगशिप कार्यक्रम स्वच्छ भारत अभियान पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या ‘फ्लॅगशिप’ कार्यक्रम आहे. त्यामुळे या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाने प्रादेशिक उपसंचालक, जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी वेळोवेळी तपासणी करावी, अन्यथा संबंधितांविरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

सामुदायिक व सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्ती व व्यवस्थापनासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी नागरी स्वराज्य संस्थांची असेल.- सोमनाथ शेटे, नोडल अधिकारी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान