शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

सहा महिन्यांपासून डायलिसिसवर असलेल्या मुलाला आईकडून पुनर्जन्म

By उज्वल भालेकर | Updated: August 19, 2023 18:12 IST

‘सुपर’मध्ये २७वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

अमरावती : स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे २७वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण करण्यात आली. सहा महिन्यांपासून डायलिसिसवर असलेल्या मुलाला आईने किडनीदान करून पुनर्जन्म दिला आहे.

अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळी येथील रहिवासी अनिल एकनाथ सातंगे (४१) यांच्या दोन्ही किडनी खराब झाल्याने मागील सहा महिन्यांपासून ते डायलिसिस उपचार घेत होते. परंतु आपल्या मुलाला होणारा त्रास पाहून त्यांची आई यमुनाबाई एकनाथ सातंगे (६२) यांनी आपल्या मुलाला किडनीदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी नेफरोलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी, युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. राहुल घुले, डॉ. प्रतीक चिरडे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण वागवाले, डॉ. दीपाली देशमुख, डॉ. जफर अली, डॉ. नंदिनी देशपांडे, डॉ. अंजू दामोदर यांनी ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.

यावेळी किडनी ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर डॉ. सोनाली चौधरी, समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे यांनी महात्मा फुले योजनेंतर्गत शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी आवश्यक मदत केली. तसेच यावेळी परिचारिका अनिता तायडे, सरला राऊत, तेजल बोंडगे, नीलिमा तायडे, तेजस्विनी वानखडे, अभिषेक नीचत, विजय गवई, जमुना मावस्कर, प्राजक्ता देशमुख, अनिता खोब्रागडे, योगिनी पडोळे, भारती घुसे, निकिता लोणारे, रेखा विश्वकर्मा, सुजाता इंगळे, श्रीधर डेंगे, औषध विभागामधील हेमंत बनसोड, नीलेश ठाकरे, अंजली दहात आहारतज्ज्ञ, अमोल वाडेकर, पंकज पिहूलकर, गजनान मातकर, अविनाश राठोड यांनीही शस्त्रक्रियेसाठी मदत केली.

टॅग्स :Healthआरोग्यOrgan donationअवयव दानAmravatiअमरावती