शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हिंसाचाराच्या तक्रारींचा ओघ अटकेतील आरोपी 278 पार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 05:00 IST

शहरातील  विविध ठिकाणी १३ नोव्हेंबर रोजी उफाळलेल्या हिंसाचार, दगडफेक, नासधूस, लूटपाट व प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी १७ नोव्हेंबर रोजीदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ते रात्रीपर्यंत झालेल्या अनेक घटनांमध्ये १७ नोव्हेंबर रोजी शहर कोतवाली, नागपुरी गेट, खोलापूरी गेट, गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शुक्रवार, शनिवारी शहरात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तक्रारींचा ओघ सुरूच असून, विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची संख्या ५० वर पोहोचली आहे. तब्बल १६ हजार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरूवारी सायंकाळपर्यंत अटक आरोपींची संख्या २७८ पार पोहोचली आहे. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता इंटरनेट बंदीचा आढावा घेतला जाणार आहे. यादरम्यान माजी मंत्री जगदीश गुप्ता व निषाद जोध यांना १५ दिवस शहराबाहेर राहण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने बुधवारी सायंकाळी दिले. शहरातील  विविध ठिकाणी १३ नोव्हेंबर रोजी उफाळलेल्या हिंसाचार, दगडफेक, नासधूस, लूटपाट व प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी १७ नोव्हेंबर रोजीदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ते रात्रीपर्यंत झालेल्या अनेक घटनांमध्ये १७ नोव्हेंबर रोजी शहर कोतवाली, नागपुरी गेट, खोलापूरी गेट, गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या कालावधीत संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. जातीय सलोखा बळकट करण्याच्या हेतूने शहरातील संवदेनशील भागात पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वात डीसीपीद्वय विक्रम साळी व एम.एम. मकानदार, सहायक आयुक्त भारत गायकवाड व पूनम पाटील ही मंडळी अहोरात्र कॉर्नर मीटिंग घेऊन एकात्मतेचा जागर करीत आहेत.

प्रक्षोभक वक्तव्यापोटी गुन्हे शहर कोतवाली पोलिसांनी आमदार प्रवीण पोटे, भाजपचे महापालिकेतील गटनेता तुषार भारतीय, माजी मंत्री अनिल बोंडे, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, माजी मंत्री जगदीश गुप्ता व अन्य ५० ते ६० जणांविरुद्ध भादंविचे कलम २९५ अ, १५३, १५३ ब, ५०५ अ, ब, २९८ अन्वये गुन्हे दाखल केले. आमदार प्रवीण पोटे, तुषार भारतीय, एक महिला, शिवराय कुळकर्णी, अनिल बोंडे यांच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी स्वतंत्र असा कलम १४३, १४७, १४८, , १४९, ३५३, ३३३, ३३६, १०७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. शासकीय कामकाजात अडथळा, जिवे मारण्याच्या हेतूने हल्ल्याचा आरोपदेखील त्यांच्यावर ठेवण्यात आला. ठाणेदार नीलिमा आरज यांनी प्रसारित ध्वनीचित्रफितीच्या आधारे ते गुन्हे दाखल केले.

याप्रकरणी आतापर्यंत २५० पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली. जातीय सलोखा टिकवून ठेवण्यासाठी, बळकट करण्यासाठी संवेदनशील भागात मोहल्ला कमिटीच्या कॉर्नर मीटिंग घेतल्या जात आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. शहर शांततेकडे वाटचाल करीत आहे. - डॉ. आरती सिंहपोलीस आयुक्त

 

टॅग्स :Policeपोलिस