शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

वाबळेवाडीच्या धर्तीवर जिल्ह्यातील २७ शाळांचा होणार ‘आदर्श’ कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने विश्वस्तरावर नावलौकिक मिळविले. याच धर्तीवर प्रत्येक तालुक्यात आता चार आदर्श शाळा विकसित केल्या जाणार आहे. त्याकरिता राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदर्श शाळांसाठी ९५० कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे ना. बच्चू कडू यांनी गरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ आता संपुष्टात येणार आहे. राज्य शासनाने पुढील चार वर्षांत १५०० शाळा आदर्श म्हणून नावारूपास आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने अमरावती जिल्हा परिषदेच्या २७ शाळा आदर्श शाळा म्हणून नावारूपास येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने विश्वस्तरावर नावलौकिक मिळविले. याच धर्तीवर प्रत्येक तालुक्यात आता चार आदर्श शाळा विकसित केल्या जाणार आहे. त्याकरिता राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदर्श शाळांसाठी ९५० कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे ना. बच्चू कडू यांनी गरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले आहे. अमरावती जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २७ शाळा आदर्श म्हणून विकसित केले जाणार आहे. यात अचलपूर, अमरावती, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, भातकुली, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दयार्पूर, धामणगाव रेल्वे, धारणी, मोर्शी, नांदगाव खंडेश्र्वर, तिवसा, वरूड आणि अमरावती महापालिका शाळांचा समावेश करण्यात आल्याचे ना. बच्चू कडू यांनी सांगितले. 

या असतील आदर्श शाळेत सुविधा

- वाढता लोकसहभाग, इंटरनेट कनेक्टिव्हिटी - १०० ते १५० पटसंख्या- शालेय प्रांगणात अंगणवाडी- आकर्षक शाळा इमारत, अध्ययन सुविधा- स्मार्ट वर्ग खोल्या, बोलक्या भिंती- मुला- मुलींकरिता पुरेशी व स्वतंत्र स्वच्छतागृहे- पेयजल सुविधा आणि हॅंडवॉश स्टेशन- मध्यान्ह भोजनाकरिता स्वयंपाकगृह, भांडार कक्ष- शैक्षणिक साहित्य, खेळाचे सुसज्ज मैदान, साहित्य- सुसज्ज ग्रंथालय, वाचनालय, संगणक कक्ष,- व्हर्च्यअल क्लास रूम, आयएसओ मानांकन- शाळेत विद्युतीकरण सुविधा, संरक्षक भिंत- शाळेत अग्निरोधक यंत्रणा, आकस्मिक प्रवेशद्धार - शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्था- उत्कृष्ट शिक्षकांना देशांतर्गत, देशाबाहेर प्रशिक्षण- विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आदर्श शाळा हा नवा उपक्रम सुरू होत आहे. यात जिल्ह्यातील २७ शाळांना स्थान मिळाले. यातून देशाभिमान, गौरवशाली विद्यार्थी घडविले जातील. आदर्श शाळेसाठी वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.             - बच्चू कडू, शालेय शिक्षण राज्यमंत्री

 

टॅग्स :Schoolशाळा