आॅनलाईन लोकमतअमरावती: परतवाडा तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (धारणी) अंतर्गत येणा-या जिल्ह्यातील २७ अनुदानित आश्रमशाळांना विविध योजनांमधून प्राप्त होणारे अनुदान दोन वर्षांपासून थकले आहे. जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणकि भवितव्याचा खेळखंडोबा चालविल्याचा या अनुषंगाने आरोप होत आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत शासकीय आणि अनुदानित अशा दोन प्रकारच्या जवळपास २७ आश्रमशाळा संचालित होतात. दोन्ही ठिकाणी नियम सारखे असले तरी शासकीय आश्रमशाळा ओस पडल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांकरिता आलेले लाखोंचे साहित्य विकले जात आहे. अनेकदा गावकºयांनी हा चोरी वजा अपहार पकडून दिला आहे.दुसरीकडे अनुदानित आदिवासी आश्रमशाळांवर जाचक अटी लादून अनुदानास विलंब लावण्याचा प्रकार सुरू आहे. सर्व सुविधा पुरविण्यात येऊनसुद्धा दोन-दोन वर्षे अनुदान अडकविण्यात आले. परिणामी संस्थाचालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. आश्रमशाळांतील ३० हजारांवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी अशाप्रकारे खेळ करण्यात येत आहे. आदिवासी विकासाचा निधी गेला कुठे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. ज्याने तक्र ार केली, त्याला अनुदान मिळण्याऐवजी नाहक त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे, अशी माहिती येथील एका आश्रमशाळा संचालकाने दिली आहे.१ ते ३ नोव्हेंबर २०१७ पर्यंत महाराष्ट्र शासनाची आदिवासी कल्याण समतिी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (धारणी) अंतर्गत आश्रमशाळांची तपासणी करणार आहे. हा दौरा निश्चित झाला असून, आदिवासी विकास विभागाकडून अनुदान वितरणासंबंधी कोणतीही कार्यवाही केली जात नाही.शाळांना अनुदानच दिले गेले नसल्यामुळे अनेक आश्रमशाळांमध्ये सोई-सुविधांचा अभाव आहे.
अमरावती जिल्ह्यातील २७ आश्रमशाळा वाºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 16:52 IST
परतवाडा तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (धारणी) अंतर्गत येणा-या जिल्ह्यातील २७ अनुदानित आश्रमशाळांना विविध योजनांमधून प्राप्त होणारे अनुदान दोन वर्षांपासून थकले आहे.
अमरावती जिल्ह्यातील २७ आश्रमशाळा वाºयावर
ठळक मुद्देआदिवासी समिती दौºयावरदोन वर्षांपासून अनुदान नाही