शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
3
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
4
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
5
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
6
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
7
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
8
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
9
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
10
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
11
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
12
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
13
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
16
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
17
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
18
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
19
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
20
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा

दीड महिन्यात विदर्भात नैसर्गिक आपत्तीचे २५ बळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 18:31 IST

२३४ गावे बाधित : ४,५०८ नागरिक विस्थापित, ३,७२५ हेक्टर जमीन खरडली

अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात १६ जुलैपर्यंत नेसर्गिक आपत्तीमुळे विभागातील २५ नागरिकांचा बळी गेला. यामध्ये २४ नागरिक जखमी झालेत. संततधार पावसाने २३४ गावे बाधित झालीत, तर १,५१३ कुटुंबांतील ४,५०८ नागरिक बेघर झाले आहेत. अतिवृष्टी व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे ३,७३५ हेक्टर शेतजमीन खरडल्यामुळे शेतकºयांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. विभागात १ जून ते १७ जुलै या कालावधीत बुलडाणा वगळता अमरावती, यवतमाळ, अकोला व वाशिम जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केली. सरासरीच्या १३० टक्के पाऊस अधिक झाला. यामुळे नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे १६ जण वाहून गेले, तर वीज पडल्याने ९ असे एकूण २५ नागरिकांचा बळी गेला. या कालावधीत संततधार पावसामुळे २३४ गावांत १,५१३ कुटुंबांतील ४,५०८ व्यक्ती बाधित झाल्यात. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १३९ कुटुंबांतील १३९, अकोला जिल्ह्यात ३५ कुटुंबातील २,७७६, व यवतमाळ जिल्ह्यात ६८० कुटुंबातील १,५९३ व्यक्ती बाधित झाल्यात. या दीड महिन्याच्या कालावधीत २५ नागरिकांचा बळी गेला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ७, अकोला १, यवतमाळ ९, बुलडाणा ३, व वाशिम जिल्ह्यात ५ व्यक्तींचा समावेश आहे. या आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १३, अकोला जिल्ह्यातील ६, व अमरावती जिल्ह्यातील ५ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. या कालावधीत नदीनाल्यांना पूर आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ३,७२५ हेक्टरमधील शेतजमिन खरडल्या गेली, तर अकोला जिल्ह्यात २९४, यवतमाळ २८ व वाशिम जिल्ह्यातील २१ हेक्टर जमिनीतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. महसूल व कृषी विभागाद्वारा बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

मृताच्या वारसांना ६० लाखांची मदतया आपत्तीमध्ये २५ नागरिकांचा बळी गेला यामध्ये १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, या प्रकरणात ६० लाखांची मदत देण्यात आली. यामध्ये ७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. या आपत्तीमध्ये मोठी दुधाळ २४ जनावरे मृत झाली. यापैकी १३ प्रकरणांत ३.४८ लाखांची मदत देण्यात आली. ४६ लहान दुधाळ जनावरे मृत झाली यापैकी १५ प्रकरणांत ४५ हजारांची मदत देण्यात आली. ओढकाम करणारी २९ जनावरे दगावली. यामध्ये २० प्रकरणांत ४.७६ लाखांची मदत देण्यात आली.

आपत्तीमध्ये १,८१६ घरांची पडझडया दीड महिन्याच्या कालावधीत ५२ घरांची पूर्ण, २९ घरांची अंशत:, १८१६ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली. ७५ झोपड्या, तर २७ गोठ्यांचे १०० टक्के नुकसान झाले. आतापर्यंत ५१ हजारांची मदत शासनाद्वारा देण्यात आली. आपत्तीमध्ये पुरात वाहून गेल्यामुळे ११ व्यक्ती, अंगावर वीज पडल्याने ९ व आपत्तीच्या इतर कारणांमुळे ५ व्यक्ती अस्या एकूण २५ नागरिकांचा बळी गेला आहे.