शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

अमरावतीत अडीच कोटी रोख, दोन किलोंचे दागिने जप्त; आयकरची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 15:51 IST

आयकर विभागाने अमरावती शहरातील उद्योगपती, बिल्डर व व्यापा-यांचे घर व कार्यालयाच्या झडती घेऊन तब्बल अडीच कोटींची रोख व दोन किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अमरावती : आयकर विभागाने अमरावती शहरातील उद्योगपती, बिल्डर व व्यापा-यांचे घर व कार्यालयाच्या झडती घेऊन तब्बल अडीच कोटींची रोख व दोन किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयकर विभागाच्या अधिकाºयांनी काही जणांचे लॉकर सील केले असून, मोठ्या प्रमाणात दस्तऐवज जप्त केले आहेत. या धाडसत्राने शहरातील व्यापारी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.       अमरावती येथील व्यापारी, उद्योजक व बिल्डरांच्या आर्थिक व्यवहारावर आयकर विभाग दोन वर्षांपासून पाळत ठेवून होते. त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास केल्यानंतर आयकर विभागाने अमरावतीत धाडसत्र राबविले. आयकर विभागाचे उपसंचालक अभय नन्नावरे व सहसंचालक एसपीजी मुदलीयार यांच्या नेतृत्वातील मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, चंद्रपूर व अमरावती येथील २५ पथकांच्या ३० वाहनांद्वारे बुधवारी बिल्डर प्रवीण मालू, तलडा बंधू, पनपालिया बंधू, अशोक सोनी, कैलास गिरूळकर, संजय बत्रा यांच्या घरांसह कार्यालयांवर छापे मारले. आयकर अधिका-यांनी आयकार्ड व वॉरंट दाखवून त्यांच्या संपत्तीविषयी दस्तऐवजांची तपासणी केली. त्यानंतर आयकर अधिकाºयांनी बिल्डर, उद्योजक व व्यापा-यांचे बयाण नोंदविले. दोन दिवस चाललेल्या या कारवाईत आयकर अधिकाºयांनी बिल्डर, व्यापारी व उद्योजकांविरुद्धचे पुरावे गोळा केले. आयकर अधिका-यांनी लॅपटॉप, मोबाईलचा बॅकअ‍ॅप घेऊन ३० हार्डडिस्क जप्त केल्या. बिल्डरांकडून इसारचिठ्ठी, उद्योजक व व्यापा-यांकडून कच्चा व पक्का मालाच्या खरेदींची बिले, न्युज पेपर, ट्रान्सपोर्ट बिल, अशाप्रकारचे दस्तऐवज जप्त केले. हे सर्व दस्तऐवज व्हेरीफाय केल्यानंतर बिल्डर, व्यापारी व उद्योजकांनी किती आयकर बुडविला, ही बाब उघड होणार आहे. त्यानंतर त्यांना तितक्याप्रमाणे आयकर भरावा लागणार आहे. 

जप्त दस्तऐवजांनी भरले तीन वाहने आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी या धाडसत्रादरम्यान बिल्डर, व्यापारी व उद्योजकांच्या घर व कार्यालयातून जप्त केलेले दस्ताऐवजांनी तीन वाहने भरली. 

अजुनही काही लॉकर उघडणे बाकीचआयकर विभागाने बिल्डर, उद्योजक व व्यापा-यांचे दहा ते बारा लॉकर सील केले. त्यापैकी केवळ तीन लॉकर उघडण्यात आले आहेत. त्यामध्येच हे दागिने व महत्त्वाचे दस्तऐवज आढळले आहे. यातील अन्य लॉकरसुद्धा उघडले जाणार असून, त्यानंतर बिल्डर, उद्योजक व व्यापाºयांच्या लॉकरमधील संपत्तीचा लेखाजोखा उघड होईल. 

आरबीआयमध्ये जमा झाली रोखजप्त केलेली अडीच कोटींची रोख वाहनांद्वारे नागपूरला नेणे शक्य नव्हते. त्यामुळे आयकर अधिका-यांनी पोलिसांच्या सरंक्षणात ती रक्कम स्थानिक बँकेत जमा केली. त्यानंतर बँकेमार्फत डीडी तयार करून ती रक्कम नागपूरच्या रिझर्व्ह बँक आॅफ इंडियात जमा केल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :Amravatiअमरावती