शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
2
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
3
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
4
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
5
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
6
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
7
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
8
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
9
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
10
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
11
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
12
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
13
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
14
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
15
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
16
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
17
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
18
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
19
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

२५ कोटी रुपये खर्चून होणार गाडगेबाबांच्या शेंडगावचा विकास

By admin | Updated: July 21, 2015 00:24 IST

कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या शेंडगावचा विकास अनेक वर्षांपासून गावकऱ्यांच्या इच्छाशक्तीअभावी रखडला होता.

गाडगेबाबांचे जन्मस्थळ : आमदारांसह अधिकाऱ्यांनी केली पाहणीदर्यापूर : कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या शेंडगावचा विकास अनेक वर्षांपासून गावकऱ्यांच्या इच्छाशक्तीअभावी रखडला होता. परंतु आता २५ कोटी रुपये खर्चून शेंडगावचा विकास होणार आहे. या पर्यटनस्थळाची पाहणी आ. रमेश बुंदिले व अधिकाऱ्यांनी नुकतीच केली.शेंडगावला तीर्थक्षेत्र तसेच पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा यासाठी शासनाचा मानस आहे. तशी मागणी सुध्दा नागरिकांनी केली आहे. यासाठी आ. रमेश बुंदिले यांच्या पुढाकाराने उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, अंजनगावचे गटविकास अधिकारी भाष्कर रेंगडे, महाराष्ट्र पर्यटन विकास प्रोजेक्टच्या अधिकारी क्षिप्रा बोरा, नायब तहसीलदार चव्हाण आदींनी शेंडगावला भेट देऊन विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जागेची पाहणी केली व गावकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आमदार बुंदिले यांना गावातील नागरिक शरद साबळे यांनी कशाप्रकारे विकास करता येईल व कुठल्या कुठल्या ई-क्लासच्या जागा सदर पर्यटन स्थळाकरिता राखीव करता येईल, याबद्दल माहिती दिली. भोलेश्वरी नदीनजीक असलेल्या ६ हेक्टर ४३ आर या ई-क्लास भूखंडाची क्षिप्रा बोरा यांनी पाहणी केली. यावेळी आ. बुंदिले यांनी श्री संत गाडगेबाबा यांच्या अस्थिकलश मंदिरात श्रीफळ फोडून पूजा केली व पर्यटन स्थळाच्या विकासाकरिता २५ कोटी रुपये निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल व त्यासंदर्भाचा पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी त्यांनी उपस्थिताना सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत पांडुरंग हुरबडे, मनोहर मुरकुटे, मुरलीधर नाईक तसेच गावच्या सरपंचा व गावकरी मंडळी उपस्थित होते.