शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

२४ लघुप्रकल्प ’ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:49 IST

जिल्ह्यात १ जून ते २ सप्टेंबर या कालावधीत ६५३.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६६५.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही १०२ टक्केवारी आहे. याच दिनांकापर्यंत मागील वर्षी ४३७.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८२ टक्के पाऊस झालेला आहे.

ठळक मुद्देपावसाची जिल्हा सरासरी पार : गतवर्षीच्या तुलनेत २२९ मिमी पाऊस अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात जून, जुलै महिना कोरडा गेल्यानंतर ऑगस्टपासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने जिल्ह्याची सरासरी पार झालेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत २२९ मिमी पाऊस अधिक झालेला आहे. जोरदार पावसाने जिल्ह्यातील चार मध्यमसह २४ लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात १ जून ते २ सप्टेंबर या कालावधीत ६५३.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६६५.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही १०२ टक्केवारी आहे. याच दिनांकापर्यंत मागील वर्षी ४३७.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८२ टक्के पाऊस झालेला आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ५७०.१ मिमी, भातकुली ३५७.३, नांदगाव खंडेश्वर ५५३.७, चांदूर रेल्वे ६५६.९, धामणगाव रेल्वे ६८७.४, तिवसा ५१५.९, मोर्शी ५३६.९, वरुड ५८१, अचलपूर ५८८.५, चांदूर बाजार ७६१, दर्यापूर ५००.७, अंजनगाव सुर्जी ४६५.८, धारणी ११२९.८ व चिखलदरा तालुक्यात १४२७.७ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.या आठवड्यात ५ तारखेपर्यंत जिल्ह्यासह विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशवर ३.४ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ते नैऋत्येकडे झुकलेले आहेत. जिल्ह्यासह विदर्भात ५ सप्टेंबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ व श्री शिवाजी कृषी महाािवद्यालयाचे प्रा. अनिल बंड यांनी सांगितले.जिल्ह्यात हे लघुप्रकल्प तुडुंबजिल्ह्यात सद्यस्थितीत नांदगाव तालुक्यातील पिंपळगाव, तिवसा तालुक्यातीळ सुर्यगंगा, अचलपूर तालुक्यातीळ खतिजापूर, गोंडवाघोली, गोंडविहीर, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सावरपाणी, टोंगलफोडी.चांदूर रेल्वे तालुक्यात टाकळी , मोर्शी तालुक्यात त्रिवेणी, वरुड तालुक्यात नागठाणा, धारणी तालुक्यात खारी, गावलानडोह, सावलीखेडा, मांडवा, रभांग, बोबदो, लवादा, सालई, बेरदा, गंभेरी, जूटपाणी, मोगर्दा, नांदूरी व चांदूर बाजार तालुक्यात चारगड प्रकल्प सदयस्थितीत ओव्हरफ्लो झालेले आहेत. तर २३ लघुप्रकल्पात ५० ते ८० टक्कयांपर्यत जलसाठा आहे.

 

टॅग्स :Damधरण