शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

२२६७ विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:36 PM

राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास सवलतीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ९ हजार ३०२ विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून पासचे वितरण करण्यात आले आहे. मोर्शी तालुक्यात २२६७ लाभार्थी आहेत. या सवलतीमुळे टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ९,३०२ लाभार्थी : दुष्काळग्रस्त भागातील मुलांना होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास सवलतीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ९ हजार ३०२ विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून पासचे वितरण करण्यात आले आहे. मोर्शी तालुक्यात २२६७ लाभार्थी आहेत. या सवलतीमुळे टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.अचलपूर तालुक्यात २ हजार ५५१, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ५४५, चिखलदरा तालुक्यातील ८०, मोशीर्तील २ हजार २६७ आणि वरूडमधील ३ हजार ८५९ अशा एकूण ९ हजार ३०२ विद्यार्थ्यांना पास वितरित करण्यात आल्या आहेत. शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीच्या मासिक पासच्या रूपाने ६६.६७ टक्के सवलत प्रवास भाड्यात दिली जाते. मात्र, दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी १०० टक्के प्रवास सवलत मिळणार आहे. या सवलतीसाठी एसटी महामंडळाच्या अमरावती विभागावर सुमारे ३९ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असला तरीही अडचणीच्या काळात शेतकरी बांधवांना मदत करणे हे एसटीचे कर्तव्य असल्याचे मानून ही सवलत देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. दरम्यान, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी एसटीच्या या उपक्रमाचे स्वागत केले. विद्यार्थ्यांपुढे यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. त्यांना एसटी प्रशासनाने दिलासा दिला आहे.एसटीतून प्रवास करणाऱ्यांमध्ये शेतकरी बांधव व ग्रामीण नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. योजनेचा लाभ शिक्षणासाठी शहरे किंवा मोठ्या गावांत जाणाऱ्या खेड्यापाड्यातील शेकडो विद्यार्थ्यांना होत आहे.- श्रीकांत गभणे, विभागीय नियंत्रक