शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथील पारंपरिक गोटमार यात्रेत २२६ जखमी

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: September 10, 2018 20:32 IST

श्रद्धेचे प्रतीक : ७१ वर्षांत १२ जणांचा मृत्यू, हजारोंना अपंगत्व, अनेकांचे संसार उघड्यावर, प्रशासन हतबल  

संजय खासबागे

वरुड (अमरावती) : येथून ३५ किमी अंतरावरावरील मध्यप्रदेशातील जांब नदीपात्रात पांढुर्णा येथे शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला जांब नदीपात्रात पांढुर्णा व सावरगाव येथील नागरिकांत परंपरेनुसार गोटमार यात्रा भरली. यामध्ये एकमेकांवर केलेल्या गोटमारीत २२६ जण जखमी झालेत. 

मध्यप्रदेश प्रशासनाने गोटमार यात्रा बंद करण्याकरिता केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहे. यावर्षीसुध्दा पोळयाच्या करीला विधिवत पळसाचे झाड लावून पूजाअर्चा झाल्यांनतर गोटमार यात्रा सुरू झाली. यात जे ४०० जण जखमी झालेत ते श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. या प्रकारात ७१ वर्षांत यामध्ये १२ लोकांचे प्राण गेले, तर हजारो नागरिकांना अपंगत्व आले आहे. परंतु ही कूप्रथा सुरूच असल्याने नागरिक याला कंटाळले असले तरी पोळ्याच्या करीला हा प्रघात नित्याने सुरुच असतो. येथे मोठी यात्रा भरत असून, विदर्भासह मध्यप्रदेशातील भाविकांची मोठी गर्दी असते.

देशात ही गोटमार यात्रा एकमेव असून, केवळ अधंश्रद्धेपाटी निर्माण झालेली श्रद्धा जागृत होऊन हा अघोरी प्रकार येथे दरवर्षी केला जातो.  ही प्रथा  ३०० वर्षांपासून आजतागायत सुरू आहे. सावरगाव येथील युवतीसोबत पांढुर्णा येथील युवकाचे प्रेमसूत जुळले होते. ते विवाहबंधनात अडणार तेवढ्यात मान-प्रतिष्ठेच्या अडथळा निर्माण झाल्याने युवतीला सावरगावातून पांढुर्णा येथे नेत असताना दोन्ही गावातील लोकांनी त्यांना जांब नदीपात्रात हेरून दोन्हीकडून दगडांचा वर्षाव प्रेमियुगुलांवर करण्यात आला. त्यात दोघे दगावले, त्यांना चंडिका मातेच्या मंदिरात पूजाअर्चा करून सहमतीने समाधी देण्यात आली. ही घटना पोळ्याची करीला घडल्याने या दिवशी  या दोन्ही गावांतील लोकं या नदीत गोटमार यात्रा भरवित असल्याची आख्यायिका आहे. या दोन्ही आख्यायिका आजही येथील नागरिक श्रद्धेने जोपासतात. यावर्षी गोटमार यात्रेत २२६ भाविक जखमी झाल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये शंकर भलावी (२५, रा. भुयारी जि. छिंदवाडा) यांचा मृत्यू झाला, तर जखमींमध्ये बाबुराव कळम्बे (५०), मनोज रेवतकर (४०, दोन्ही रा.पांढुर्णा) गंभीर जखमी झाल्याने नागपूरला हलविण्यात आले. सायंकाळी ५.३० पर्यंत २२६ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र