शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जिल्ह्यात २२६ डेंग्यू पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:01 IST

गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यूने जिल्ह्यात थैमान घातले आहे. खासगी डॉक्टरांकडे हजार रुग्णांनी उपचार घेतला असून, एनएस-वन ही डेंग्यूसाठी उपयुक्त असलेली रक्तजल चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

ठळक मुद्देशासकीय अहवाल : महापालिका हद्दीत १९० रुग्ण

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यूने जिल्ह्यात थैमान घातले आहे. खासगी डॉक्टरांकडे हजार रुग्णांनी उपचार घेतला असून, एनएस-वन ही डेंग्यूसाठी उपयुक्त असलेली रक्तजल चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता खुद्द यवतमाळ शासकीय सेंटिनल सेंटरने जिल्ह्यात २२६ डेंग्यूरुग्ण आतापर्यंत पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिला. यामध्ये १९० सर्वाधिक रुग्ण हे अमरावती महापालिका हद्दीतील आहेत.महापालिका, जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा, उपजिल्हा रुग्णालयांकडून प्राप्त २४३० रक्तजल नमुने यवतमाळ येथील शासकीय सेंटनल सेंटरला तपासणीसाठी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने पाठविले. दीड हजारांवर रक्तजल नमुने हे एकट्या महापालिका हद्दीतील आहेत. प्रत्येक एमडी (मेडिसीन) डॉक्टरांकडे रोज दोन ते तीन डेंग्यू रुग्णांची प्राथमिक चाचणी ही पॉझिटिव्ह निघत आहेत. त्या कारणाने अद्यापही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. गेल्या दोन आठवड्यात खासगी डॉक्टरांकडे ७० पेक्षा जास्त डेंग्यूरुग्ण आढळून आले. या महिन्यात अनेकांचा डेंग्यूने बळीदेखील घेतला. मात्र, आरोग्य यंत्रणेने हा विषय अद्यापही गांभीर्याने घेतलेला नाही. शुक्रवारी २१ डेंग्यूरुग्णांचे रक्तजल नमुने हे पॉझिटिव्ह आले. यवतमाळ येथे पाठविण्यात आलेल्या हजारो रक्तजल नमुन्यांचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. त्या कारणाने डेंग्यूरुग्णाचा निश्चित आकडा प्राप्त नसला तरी संख्या निश्चितच वाढली आहे. या ठिकाणी एनएस-वन किट उपलब्ध नसल्याने आठ दिवसानंतर आयजीएम व आयजीजी ही चाचणी करण्यात येते. त्या कारणाने अनेक रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह असतानाही अहवाल मात्र निगेटिव्ह येत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.झेडपीकडे २७ रुग्णांची नोंदआतापर्यंत २७ डेंग्यूरुग्ण ग्रामीण भागात आढळून आल्याची नोंद जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेकडे असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली. ‘लोकमत’ने सातत्याने हा विषय लोकदरबारात मांडल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी घेतली. डेंग्यूबाबत योग्य उपाययोजना करण्याचे व सर्तकता बागळण्याचे निर्देश त्यांनी दिले.सक्षम यंत्रणा नाही?डेंग्यूची एनएस-वन चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेला आपल्याकडे डेंग्यूचा रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती खासगी डॉक्टर देतात. मात्र, रक्तजल नमुने घेण्यासाठी सक्षम यंत्रणा महापालिकेकडे नाही. दोन आरोग्य कर्मचारी ४० ते ५० डॉक्टरांकडे ते पोहोचू शकत नाहीत. यामुळे ज्या पॅथालॉजिस्टकडून डेंग्यूची चाचणी करण्यात येते, तेथूनच रक्तजल (सिरम) नमुने महापालिकेचे हे आरोग्य कर्मचारी मिळवतात. खासगी डॉक्टर महापालिकेला पूर्वीपासूनच मदत करीत आहेत.मलातपूर येथील माजी सरपंचाचा मृत्यूधामणगाव रेल्वे : बदलत्या वातावरणाने तालुकाभर डेंग्यूसह साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. अशातच तालुक्यातील मलातपूर येथे माजी महिला सरपंचाचा डेंग्यूसदृष्य तापाने मृत्यू झाला. खाजगी रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयही रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे.मंदा ज्ञानेश्वर घरडे (५०) मृताचे नाव आहे. सेवाग्राम येथील रुग्णालयात बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. डेंग्यूच्या तापाने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. डेंग्यूसदृश तापाचा एका वर्षात ही महिला चौथा बळी ठरली आहे. यापूर्वी तळेगाव दशासर येथील भूमिका शरद बुल्ले या चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला, तर झाडगाव येथील चिमुकलीचाही या आजाराने घात केला. आता देवगाव , जळका पटाचे, सावळा, नारगावंडी या ठिकाणीही तापाचे रुग्ण आढळत आहेत.दरम्यान, शहरातील रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. त्याचबरोबर विविध साथीच्या आजारांनीही डोके वर काढले आहे. दूषित पाण्यामुळे होऊन गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, काविळ, विषमज्वर आदी आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. सद्यस्थितीत शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये डायरिया व टायफॉइडचे रुग्ण सर्वाधिक आहेत. ग्रामीण रुग्णालयात दररोज दोनशे बाह्यरुग्ण तपासणी करण्यासाठी येत असल्याची माहिती अधीक्षक महेश साबळे यांनी दिली.