शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
3
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
4
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
5
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
6
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
7
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
9
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
10
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
11
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
12
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
13
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
14
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
15
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
16
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
17
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
18
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
19
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
20
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात २२.४४ लाख हेक्टर बाधित; १५४३.६७ कोटींची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 16:19 IST

पंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल; पश्चिम विदर्भात २०.२५ लाख शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका

अमरावती : विभागात १७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या परतीच्या पावसाने २० लाख २५ हजार १९७ शेतकऱ्यांच्या २२ लाख ४४ हजार ३९८ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्याने विभागीय आयुक्तांनी तसा अहवाल महसूल विभागाच्या उपसचिवांना पाठविला आहे. यामध्ये ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे १५४३ कोटी ६७ लाखांच्या अपेक्षित निधीची मागणी केली आहे.

अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे विभागात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी संयुक्त पंचनाम्याचे आदेश २९ ऑक्टोबरला दिले होते. त्यानुसार गुरुवारी हा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील १२ लाख २६ हजार ३७६ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे.

कपाशीचे ८ लाख २१ हजार २७० हेक्टर, खरीप ज्वारी ४२ हजार ९६ हेक्टर, तुरीचे ५१ हजार ३४३ हेक्टर, मका पिकाचे ३१ हजार ३४१ हेक्टर, धान पिकाचे ५ हजार ५३८ हेक्टर, उदीड पिकाचे ९ हजार २८९ हेक्टर व इतर खरीप पिकांचे ३६ हजार ६६९ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे संयुक्त पंचनाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी राट्रीय आपदा कोषातून (एनडीआरएफ) १५१२ कोटी २८ लख ९८ हजारांच्या अपेक्षित मदत निधीची मागणी विभागीय आयुक्तांनी महसूल विभागाकडे केली आहे. जिल्हा व पिकनिहाय नुकसान (हेक्टर/लाखात)

जिल्हा         शेतकरी       सोयाबीन       कपाशी        बाधित क्षेत्र      अपेक्षित निधीअमरावती    ३७४८०४    २१२३२९        १३५४७२      ३७३०१९        २५३६५.३५    अकोला       २९७६६८     १७३४०५      १५३०९५      ३६३०५९       २४८२४.७१यवतमाळ    ४३२१००      २०९६८६      ३०२१४७      ५२१००४        ३५४२८.२७बुलडाणा    ६३४०७९      ३७१२५४      २०९९२०      ६८१२०५        ४६३२१.९८वाशीम        २४६३९४     २५९७०१      २०६३५        २८३६५६        १९२८८.६७एकूण       १९,८५,०४५   १२,२६,३४६   ८,२१,२७०   २२,२३,९५५    १५१२,२७९८

असे आहे बागायती व फळपिकांचे नुकसान

विभागात २७ हजार ५६९ शेतकºयांच्या १२ हजार २३ हेक्टरमधील बागायती पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये केळी/पपई ८६१ हेक्टर, भाजीपाला ९३३८ हेक्टर, हरभरा ४०७ हेक्टर, ५.४० हेक्टर गहू, ४.४ हेक्टर मका, १५५ हेक्टर हळद व इतर पिकांचे १२५० हेक्टरमध्ये नुकसान झाले. यासाठी १६ कोटी २३ लाख १७ हजारांच्या निधीची मागणी करण्यात आली. 

विभागात १२ हजार ५८३ शेतकºयांच्या ८४१९ हेक्टरमधील फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यामध्ये ४०३२ हेक्टरमधील संत्रा, मोसंबी, लिंबू, ८७ हेक्टरमध्ये आंबा, ९०८ हेक्टरमध्ये डाळिंब, १९३७ हेक्टरमध्ये केळी, पपई, ४८ हेक्टरमध्ये पेरू, २०६ हेक्टरमध्ये द्राक्ष व इतर फळपिकांचे ११९८ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. यासाठी १५ कोटी १५ लाखांची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती