शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दोन वर्षांत २२ वाघ मारले; माजी वनमंत्र्यांच्या पत्राने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 13:42 IST

गत दाेन वर्षांत २२ वाघ मारले गेल्याच्या घटना या व्याघ्र संरक्षणाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे पत्र राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देखबऱ्यांच्या हालचालींवर संशय, व्याघ्र संरक्षणाचे प्रशासनासमोर आव्हान

अमरावती : देशात बहुतांश वाघ महाराष्ट्रात असून त्यातही विदर्भात सर्वाधिक वाघ आहेत. मात्र, गत दाेन वर्षांत २२ वाघ मारले गेल्याच्या घटना या व्याघ्र संरक्षणाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे पत्र राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. वन विभागाने खबऱ्यांवरही सूक्ष्म नजर ठेवावी, असा सल्ला देखील मुनगंटीवार यांनी वन खात्याला दिला आहे.

माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सन जानेवारी २०२० ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत वाघ, बिबट्यांच्या शिकारीचा दाखला देत सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत विशेष समिती नेमावी, असे पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २८ फेब्रुवारी २०२२ रोजी दिले होते. तथापि, या पत्राच्या अनुषंगाने वन खात्याने वाघांची शिकार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, हे वास्तव आहे.

ब्रम्हपुरी वनविभागात वन विभागाने ताब्यात घेतलेला आराेपीच खबऱ्या बनून वन्यजीव शिकारीची माहिती देऊन बक्षीस घेत असल्याची बाब समोर आली होती. अटकेतील आरोपीचा गत दोन वर्षांत चंद्रपूर जिल्हा अथवा विदर्भात वाघांच्या शिकार प्रकरणी हस्तक्षेप असावा, असा अंदाज मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे गत दोन वर्षांत २२ वाघ मारले गेले, याप्रकरणी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत विशेष चौकशी नेमावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.

वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना १५ ऐवजी २० लाखांची मदत मिळावी, यासाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देण्यात येणार आहे. आर्थिक मदत मिळण्यासाठी वन विभागाने निगेटिव्ह प्रणाली सुरू करावी, असा प्रयत्न असेल. विशेषत: व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी खबऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवावी.

- सुधीर मुनगंटीवार, माजी वनमंत्री तथा आमदार.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचे मृत्यू

  • कापसी (ता. सावली), २८ जानेवारी २०२०
  • मुडझा (ता. ब्रम्हपुरी), ११ जानेवारी २०२०
  • पिंपळखुट (ता.चंद्रपूर), १८ जून २०२०
  • मुधोली (ता. भद्रावती), २४ जुलै २०२०
  • रत्नापूर (ता.सिंदेवाही ) ४ नोव्हेंबर २०२०
  • चक बोर्डा (ता.चंद्रपूर), २५ एप्रिल २०२१
  • धानोरा (ता. सिंदेवाही), ८ जून २०२१
  • पाचगाव (ता. गाेंडपिंपरी) , २१ ऑगस्ट २०२१
  • भटारी (ता. पोंभुर्णा), १० सप्टेबर २०२१
  • चिंचबोडी (ता. सावली), ८ ऑक्टोबर २०२१
  • खरकाडा- वाढोणा (ता. नागभीड), २२ नोव्हेंबर २०२१
  • नलफाडी (ता. राजुरा), १० जानेवारी २०२१
  • तोरगाव (ता. ब्रह्मपुरी), ९ फेब्रुवारी २०२२
टॅग्स :TigerवाघSocialसामाजिकSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार