शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
4
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
5
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
6
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
7
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
8
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
9
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
10
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
11
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
12
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
13
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
14
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
15
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
16
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
17
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
18
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
19
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार

२१ हजार हेक्टर संत्राबागा ‘सलाईन’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:29 PM

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे २० हजार ६०० हेक्टर जमिनीवरील संत्राबागा दुष्काळाच्या तडाख्यात सापडल्या आहेत.

ठळक मुद्देविहिरींनी गाठले तळ : भूजल जलपातळीत कमालीची घसरण

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे २० हजार ६०० हेक्टर जमिनीवरील संत्राबागा दुष्काळाच्या तडाख्यात सापडल्या आहेत.तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर शेतजमीन संत्रा लागवडीखाली आहे. गहू, चणा, मका, मिरची, पालेभाज्या आदी बागायती पिके घेतली जातात. तथापि, तालुक्यातील नऊ सिंचन प्रकल्पांमध्ये यंदा ५ ते १५ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. जानेवारीमध्ये तोही आटण्याची चिन्हे आहेत. बोअरचे पाणी ७०० ते ८०० फुटांवर खोल गेले आहे. तसेच विहिरींची जलपातळी ६० ते ७० फुटांवर खोल गेली आहे. दिवसभर पाण्याचा उपसा करूनही न आटणाऱ्या विहिरी आता अर्ध्या तासांतच आटू लागल्या आहेत. काही विहिरी आचके देत आहेत. त्यामुळे संत्रा जगविण्याचा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. पाण्याबाबत पर्याय नसल्याने शेतकऱ्यांची हतबलता वाढली आहे.नर्सरीधारकांपुढेही पेचतालुक्यात ४०० पेक्षा अधिक संत्रा कलमा तयार करणारे नर्सरीधारक शेतकरीच आहेत. यावर्षीसुद्धा कोट्यवधी कलमांची निर्मिती करण्यात आली आहे. तथापि, पाण्याअभावी मृग बहर संत्राउत्पादकांकडून तोडला जात असताना, या कलमांना बाजारपेठ उपलब्ध आहे का, असा प्रश्न नर्सरीधारकांचा आहे.बोअरची परवानगी द्यायेणाऱ्या काळात लाखो संत्राझाडे आणि कोट्यवधी कलमा पाण्याअभावी संपतील. भूजल पातळीत कमालीची घसरण झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. त्यामुळे अधिकाºयांनी शेतकऱ्यांना बोअरवेल करू द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.