शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार लाडक्या बहिणींना केवायसी न करणे भोवले; नोव्हेंबरपासून थकलेले हप्ते केव्हा मिळणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 18:30 IST

Amravati : गाव पातळीवरील सीएससी व सेतू केंद्रधारकांनी योग्य सहकार्य न केल्यामुळे जिल्ह्यातील २० हजारांवर लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालीच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गाव पातळीवरील सीएससी व सेतू केंद्रधारकांनी योग्य सहकार्य न केल्यामुळे जिल्ह्यातील २० हजारांवर लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालीच नाही. त्यामुळे या महिलांचे नोव्हेंबर २०२५ पासूनचे पैसे अडले आहेत. परिणामी, शासनाने आम्हाला पुन्हा एकदा ई-केवायसीची संधी द्यावी, अशी त्यांची मागणी असून, त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांना साकडे घातले आहे.

महिला या मुख्यत्वे ग्रामीण भागातील आहेत. ई-केवायसीसाठी त्या वारंवार सेतू व सीएससी केंद्रांवर जात होत्या. परंतु, कधी सर्व्हर डाऊन तर कधी विजेचा लपंडाव यामुळे ३१ डिसेंबरच्या आत त्यांची ई-केवायसी झाली नाही. बहुतेक महिला म्हणतात की, त्यांनी ई-केवायसीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे गोळा केली होती. काहींनी ती सेतू केंद्रचालकांकडेही सोपविली. परंतु, तरीही त्यांची ई-केवायसी वेळेत पूर्ण झाली नाही. परिणामी, त्यांचा लाभ बंद झाला आहे. शासनाने सध्या ई-केवायसीदरम्यान चुकीची माहिती अपलोड केलेल्या महिलांना पुन्हा दुरुस्तीची संधी दिली आहे. त्यामुळे त्या महिला आगामी ३१ मार्चपर्यंत आवश्यक ती दुरुस्ती करू शकतात. त्याच धर्तीवर आम्हालाही ई-केवायसीची संधी द्यावी, अशी मागणी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी केली आहे.

जिल्ह्यात ७ लाखांवर लाडक्या बहिणींचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. या महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची रक्कमही मिळत गेली. या काळात शासनाने पडताळणीसाठी सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करायला होती. ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख होती. परंतु, या काही हजारो महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. यासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याआधारे जिल्हाधिकारी महोदयांकडे प्रस्ताव पाठविला जाईल असे महिला बालविकारी अधिकारी अतुल भंडागे यांनी सांगितले.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAmravatiअमरावती