शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

१९ ग्रामपंचायतीत २००० मजूर कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

कोरोनामुळे २३ मार्च रोजी देश लॉक डाउन त्यामुळे मेळघाटातील गोरगरीब आदिवासीच्या हातांना काम नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. अशात मग्रारोहयो अंतर्गत कामे पूर्ण बंद पडली होती. गत आठवड्यापासून घरकुल, सीसीटी, वृक्षलागवड आदी कामे ग्रामपंचायतीमार्फत सुरू करण्यात आली. १९ ग्रामपंचायती अंतर्गत दोन हजारांपेक्षा अधिक मजुरांची उपस्थिती कामावर आहे.

ठळक मुद्देमास्क, सॅनिटायझर वाटप : मेळघाटात मग्रारोहयो अंतर्गत कामावर नवीन नियमावली

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : लॉकडाऊनच्या काळात मेळघाटात ग्रामपंचायतींकडून नियमांचे पालन करीत आदिवासी मजुरांसाठी मग्रारोहयो अंतर्गत कामे सुरू केली आहेत. तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींमध्ये दोन हजारांवर मजूर कामावर उपस्थित आहेत. त्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप सोमवारी चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी मोथा येथे कामाच्या पाहणीदरम्यान सोमवारी केले.कोरोनामुळे २३ मार्च रोजी देश लॉक डाउन त्यामुळे मेळघाटातील गोरगरीब आदिवासीच्या हातांना काम नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. अशात मग्रारोहयो अंतर्गत कामे पूर्ण बंद पडली होती. गत आठवड्यापासून घरकुल, सीसीटी, वृक्षलागवड आदी कामे ग्रामपंचायतीमार्फत सुरू करण्यात आली. १९ ग्रामपंचायती अंतर्गत दोन हजारांपेक्षा अधिक मजुरांची उपस्थिती कामावर आहे. मोथा, मडकी गावात या कामांना भेट देऊन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी मजुरांचे प्रबोधन केले. पंचायत समितीमार्फत मजुरांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. सोशल डिस्टस्टिंग पाळण्याचे आवाहन केले.कोरोना मुळे नवीन नियमावलीरोजगार हमीच्या मजुरांनी सोशल डिस्टस्टिंग पाळावे. दोन मजुरांमध्ये किमान एक ते दोन मीटर अंतर ठेवावे. काम करताना नेहमी तोंडाला मास्क लावावा. मास्क पंचायत समितीकडून पुरवण्यात येत आहे. वैयक्तिक स्वच्छता पाळावी. दर एक तासाला हात साबणाने स्वच्छ धुवावे. वरचे वर हाताला अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर लावावे. काम करताना किंवा इतर ठिकाणी वावरताना गर्दी करू नये.कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउनचे पालन करावे. गावात, सार्वजनिक ठिकाणी, दुकानात गर्दी करू नये. प्रशासनाला सहकार्य करावे. आपल्या काही अडचणी असतील, तर व्हॉट्सअ‍ॅप किंवा रोजगार सेवकामार्फत प्रशासनाला कळवाव्यात. रोजगार सेवक, तांत्रिक अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी मजुरांचे आरोग्य चांगले राहील याची काळजी घ्यावी. कोणत्याही मजुराला ताप/थंडी/खोकला अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यातर्फे करण्यात आले आहे.

मग्रारोहयो अंतर्गत विविध कामे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येत आहे. दोन हजारांवर मजूर असून, त्यांच्यासाठी लॉकडाऊन अंतर्गत नियमावली लागू करण्यात आली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे.- प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, चिखलदरा

टॅग्स :Socialसामाजिक