शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
2
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
4
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
5
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
6
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
7
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
8
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
9
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
10
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
11
शेअर बाजाराचा चौकार, ६.३७ टक्क्यांनी वाढला सेन्सेक्स; सलग चौथ्या दिवशी बाजारात वाढ
12
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
13
"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये"
14
महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव, भीमराव पांचाळे, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वेंचा सन्मान
15
NASHIK FIRE BREAKING VIDEO: नाशिकमध्ये अग्निकल्लोळ! प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग; १८ बंब पोहोचले, तरीही...
16
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले
17
निलंबित PSI रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप
18
IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!
19
MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...
20
दूतावासामधून तक्रार, सरकारने जेएनयूच्या ज्येष्ठ प्राध्यापकांना तातडीने केलं बरखास्त, केलं होतं धक्कादायक कृत्य

पश्चिम विदर्भात पोलिस पाटलांची २००० पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:07 IST

Amravati : प्रशासनासह पोलिसांची श्रृंखला पश्चिम विदर्भात विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रशासनासह पोलिस यंत्रणेचा दुवा म्हणून काम करणाऱ्या पोलिस पाटलांची तब्बल २०४८ पदे पश्चिम विदर्भात रिक्त आहेत. एकूण मंजूर ५७९८ पदांच्या तुलनेत ३६ टक्के पदे रिक्त असल्याने संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. 

पूर्णवेळ प्रशासन व पोलिसांना सहकार्य करीत असल्याने गावपातळीवरचे हे महत्त्वाचे पद आहे, तरीही या पदाच्या नियुक्तीसाठी प्रशासनात दिरंगाई होत असल्याचा पोलिस पाटील संघटनेचा आरोप आहे. पोलिस पाटील हा ग्रामीण भागातील एक महत्त्वाचा प्रशासकीय आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाचा घटक व शासन आणि पोलिस प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. गावातील कायदा-सुव्यवस्था राखणे सोबतच शांतता आणि सुव्यवस्थेसाठी प्रयत्न करणे, अनुचित प्रकारांबाबत पोलिस ठाण्याला माहिती देणे यासह अन्य कर्तव्य पोलिस पाटील वेळोवेळी पार पाडतात.

स्थानिक वाद सोडविण्यात महत्त्वाची भूमिकागावात एखादी संशयास्पद व्यक्ती आल्यास पोलिसांना तत्काळ कळवणे, चोरी, मारामारी, खून, दंगल यासारख्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देणे, पूर, आगीसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत आणि बचावकार्य करणे, गावकऱ्यांना आपत्तीविषयी सतर्क करणे आणि मदत पुरवणे यासोबतच स्थानिक वाद सोडवणे यासह अनेक कार्य पोलिस पाटील करतात.

पश्चिम विदर्भातील स्थितीमंजूर पदे - ५७९८कार्यरत पदे - ३७५०रिक्त पदे - २०४८

"पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्यात यावी, मानधनवाढ, यासह अन्य मागण्यांसाठी शासनाला वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संघटनेद्वारा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल."- राहुल उके, कार्यकारी अध्यक्ष, पोलिस पाटील संघटना.

टॅग्स :Amravatiअमरावती