शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

५०० मीटरसाठी २० किलोमीटरचा वळसा !

By admin | Updated: April 18, 2016 00:02 IST

जिल्हा स्त्री रुग्णालयातील दोन महिलांना इर्विनमध्ये हलविण्यासाठी चक्क २० किलोमीटर अंतरावरील भातकुलीवरून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलविण्यात आली.

भातकुलीहून आली ‘१०८’ : डफरीन ते इर्विन रूग्ण ‘रेफर’अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील दोन महिलांना इर्विनमध्ये हलविण्यासाठी चक्क २० किलोमीटर अंतरावरील भातकुलीवरून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलविण्यात आली. हा प्रकार रविवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास घडला. यावरून या रुग्णवाहिकांचा दुरुपयोग होत असल्याचे आढळून येत आहे. असल्या प्रकारामुळे शासनाला लाखोंचा फटका बसत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील दोन महिलांची प्रकृती रविवारी दुपारी ११.४५ वाजताच्या दरम्यान अचानक बिघडली. त्यामुळे तेथील डॉक्टर व परिचारिकांनी १०८ क्रमांकाला कॉल करून रुग्णवाहिका पाठविण्यास सांगितले. १०८ क्रमांकाच्या कॉल सेन्टरला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ अमरावतीमधील केंद्राला कळविले. डफरीन रूग्णालयानजीक असणारी १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका तत्काळ डफरीन रुग्णालयात पाठवा, असे कॉल सेन्टरवरून रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्याला सांगण्यात आले. मात्र, डफरीनजवळ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे कॉलसेन्टरवरून भातकुली पीएचसीतील रूग्णवाहिका बोलाविण्यात आली. अवघ्या पाचशे मिटर अंतरावरील रुग्णालयात जाण्यासाठी २० किलोमिटरवरून रुग्णवाहिका बोलविण्याचा हा प्रकार शासननिधीचा गैरवापर आहे. रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास १०८ क्रमांकाची एम.एच. ४-सी.एल.-०५६५ ही रूग्णवाहिका इर्विन रुग्णालयाच्या आवारात उभी होती.शासनाच्या रुग्णवाहिकेचा वापर घटलाअमरावती : या रुग्णवाहिकेद्वारे डफरीनमधील दोन रुग्णांना इर्विनमध्ये आणले गेले. शासनाने रुग्णांना ने-आण करण्यासाठी बहुंताश रुग्णालयांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहे. इर्विन व डफरीनमध्येही रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र, जेव्हापासून १०८ रुग्णवाहिका कार्यान्वित झाल्यात, तेव्हापासून जुन्या रुग्णवाहिकांचा वापर कमी केल्या जात आहे. आपातकालिन स्थितीत रुग्णांना आरोग्य सेवा देणारी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका आहे. मात्र, अनेकदा किरकोळ रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिकेचा वापर केला जातो. डफरीनमधून इर्विनमध्ये रुग्ण रेफर केला जातो आणि त्यासाठी भातकुलीवरून रुग्णवाहिका बोलाविण्यात येते हा प्रकार शासनाला चुना लावणाराच आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक वारे यांच्याशी सपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)भाजलेल्या रुग्णाला करावी लागली प्रतीक्षाभातकुलीवरून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका डफरीनमध्ये बोलाविण्यात आल्याने सायत गावातील एका भाजलेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेची प्रतिक्षा करावी लागली. भातकुली पीएससीमधील ही १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका अमरावतीत आल्याने सायत रुग्णाला ताटकळत राहावे लागल्याची माहिती रुग्णवाहितील संबधीत कर्मचाऱ्यांने दिली. असे प्रकार घडत असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.