नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : परतवाडा-इंदूर या महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या आंतरराज्य महामार्गावर अतिधोकादायक ठरलेल्या सेमाडोहनजीकच्या भूतखोरा, मोतीनाला व धुळणी नाल्यावरील पुलाचे बांधकाम व्याघ्र प्रकल्पाने बंद पाडले. काही वर्षांत या धोकाग्रस्त पुलावर अपघात होऊन २० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला. आणखी किती बळी हवेत, त्यानंतर कामाला मंजुरात मिळेल का, असा संतप्त सवाल नागरिकांचा आहे.परतवाडा सेमाडोह धारणी इंदूर या मार्गावर अनेक ब्रिटिशकालीन पुलावरील धोकाग्रस्त वळणामुळे तेथे नवीन बांधकाम करणे गरजेचे आहे. सेमाडोहनजीक तर भुतखोरा, मोतीनाला, धुळगी नाला धोकादायक वळणावर पूल आहेत. यातील दोन पूल प्रवाशांच्या जीवावर उठले आहेत. भूतखोरा आणि धुळगीनाला पूलावर यू आकाराचे वळण आहे. रस्ता निर्मितीपासून या वळणावर वर्षभर अपघाताची मालिका दहशत निर्माण करणारी ठरली आहे. तेथील पुलनिर्मितीतून व्याघ्रप्रकल्पाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही, उलट त्यांना जागा दिली जाणार असतानाही आडमुठे धोरण अवलंबिले गेल्याची ओरड आहे.बांधकाम विभागाचे काम व्याघ्र प्रकल्पाने पाडले बंदब्रिटिशकालीन जुन्या पुलांचे बांधकाम धोकाग्रस्त झाल्याने त्याऐवजी नवीन पाच पुलांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाकडून परवानगी घेतली. कामाच्या निविदा काढून कंत्राटदारामार्फत कामाला सुरुवातसुद्धा झाली. मात्र, अचानक व्याघ्र प्रकल्पाच्या सूचनेनुसार काम बंद करण्यात आले. नवीन नियमानुसार पुन्हा फेर प्रस्तावही पाठविण्यात आले. मात्र, काही एक परिणाम झालेला नाही.भूतखोरा आणि धुळगीनाला येथे दोन पूल निर्मिती बांधकाम व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने बंद करण्यात आले. आर्च टाईप पद्धतीचे सुंदर डिझाइनचे पूल बांधून शिल्लक जागा व्याघ्र प्रकल्पाला मिळणार होती. मात्र बांधकाम बंद पाडण्यात आले.- मिलिंद पाटणकर, अभियंता
मेळघाटच्या भूतखोरा मोतीनाला पुलावर २० बळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST
मोतीनाला व धुळणी नाल्यावरील पुलाचे बांधकाम व्याघ्र प्रकल्पाने बंद पाडले. काही वर्षांत या धोकाग्रस्त पुलावर अपघात होऊन २० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला. आणखी किती बळी हवेत, त्यानंतर कामाला मंजुरात मिळेल का, असा संतप्त सवाल नागरिकांचा आहे. परतवाडा सेमाडोह धारणी इंदूर या मार्गावर अनेक ब्रिटिशकालीन पुलावरील धोकाग्रस्त वळणामुळे तेथे नवीन बांधकाम करणे गरजेचे आहे.
मेळघाटच्या भूतखोरा मोतीनाला पुलावर २० बळी!
ठळक मुद्देबेदखल : मध्यप्रदेश महामार्गावरील काम पाडले बंद