शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी, सुलतानी संकटाचे १० हजार बळी दुर्लक्षित; संघर्षावर नैराश्य भारी, पश्चिम विदर्भातील वास्तव

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 21, 2023 14:53 IST

आतापर्यंत १९४०७ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू

अमरावती : पश्चिम विदर्भात सन २००१ पासून सुरु झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेल नाही, आतापर्यंत १९४०७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी ९०७७ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली आहेत. आतापर्यंत १०१४१ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्याने त्यांना शासन मदत मिळाली नसल्याचे वास्तव आहे. याशिवाय १८९ शेतकरी आत्महत्यांची अद्याप चौकशी करण्यात न आल्याने प्रलंबित आहेत.

राज्यात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्या प्रकरणांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येत आहे. विदर्भ व मराठवाड्यातील १३ जिल्हे शेतकरी आत्महत्याप्रवण आहेत. या सर्व जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी कार्यालयातया अनुषंगाने कक्ष सुरु करण्यात आलेले आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारी, वसुलीचा तगादा, मुलिंचे लग्न याशिवाय अन्य कारणांनी नैराश्य येऊन शेतकरी मृत्यूचा घोट घेत आहेत.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात व त्याही अमरावती जिल्ह्यात होत आहे. विभागात २०२३ च्या सहा महिन्यात तब्बल ५४२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. यामध्ये २२७ प्रकरणे शासन मदतीला प्राप्त ठरली आहे. याशिवाय १३५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आलेली आहे. अद्याप १८० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा अहवाल आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीDeathमृत्यूAmravatiअमरावती