लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावंडगाव येथे १९ वर्षीय युवकाने पाच वर्षीय पुतणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली.राहुल दिलीप ढोकणे असे आरोपीचे नाव आहे. तो अंजनगाव येथील एका महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षाला शिकतो. ६ आॅगस्ट रोजी पीडित मुलीची आई-वडील शेतमजुरीकरिता शेतात गेले होते. आरोपी राहुल ढोकणे याचे आई-वडीलसुद्धा शेतात गेले. चुलत पुतणी असलेली पीडित मुलगी घरात एकटीच खेळत असल्याने राहुलने तिला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे आढळून आल्याने शेतातून परतलेल्या आईने तिला प्रथम गावातीलच खासगी दवाखान्यात नेले. तेथे हा प्रकार उघडकीस आला. राहुलने सदर कृत्य केल्याचे तिने सांगितले.संतप्त आईने ७ आॅगस्ट रोजी रहिमापूर पोलीस ठाण्यात राहुल ढोकणेविरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी राहुलला तात्काळ अटक करून भादंविच्या कलम ३७६ (२), (१), ४, ६ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.काका-पुतणीच्या नात्याला काळिमा फासलेसदर घटनेतील आरोपी पीडिताचे चुलत काका असून, या कृकृत्याने काका-पुतणीच्या नात्याला नात्याला काळिमा फासली गली. यावरून समाजात विश्वास ठेवायचा तरी कुणावर, हा प्रश्न समाजमनाला स्पर्शून गेला. या घटनची माहिती होताच परिसरात खळबळ उडाली. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.सदर आरोपीस तत्काळ अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी अंजनगाव सुर्जी न्यायालयात हजर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.- जमील शेख, ठाणेदार, रहिमापूर पोलीस ठाणे
अमरावती जिल्ह्यात १९ वर्षीय काकाचा पाच वर्षांच्या पुतणीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 14:51 IST
रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावंडगाव येथे १९ वर्षीय युवकाने पाच वर्षीय पुतणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली.
अमरावती जिल्ह्यात १९ वर्षीय काकाचा पाच वर्षांच्या पुतणीवर बलात्कार
ठळक मुद्देआरोपीस अटकरहिमापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल