शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

ठिबक सिंचनावर १८ टक्के अधिभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:08 IST

कमी पर्जन्यमानात शेतकºयांचे तारणहार व पिकांना संजीवनी देणाºया ठिबक संचांच्या साहित्याच्या दरात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देजीएसटीचा फटका : ८ ते १० हजारांनी महागले संच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कमी पर्जन्यमानात शेतकºयांचे तारणहार व पिकांना संजीवनी देणाºया ठिबक संचांच्या साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. आता १८ टक्के जीएसटीचा अधिभार लागण्याने संचासाठी ८ ते १० हजार आगाऊ मोजावे लागल्याने सिंचन सुविधा महागल्याचा थेट फटका शेतकºयांना सोसावा लागत आहे.कमी दाबाने व नियंत्रित दराने पिकांच्या गरजेनुसार मुळांच्या कक्षेत समप्रमाणात सिंचनाचे पाणी देण्यासाठी जिल्ह्यात ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला जातो. थेंबा-थेंबाने किंवा सूक्ष्म धारेने पाणी दिल्यामुळे टंचाईच्या काळातही पीक जगविणे सहज शक्य आहे.आजच्या घडीला ठिबक सिंचनाला पर्याय नाही. मात्र दोन महिन्यापूर्वी जीएसटी लागू झाल्यानंतर या सिंचनसुविधेवर १८ टक्कयांचा अधिभार लावण्यात आल्याने सिंचनाच्या खर्चात वाढ झाली. यापूर्वी शेतात ठिबकची सुविधा बसविण्यासाठी साधारणपणे ७० हजारांपर्यंत खर्च यायचा. आता मात्र जीएसटी लागू झाल्याने ७८ हजार ५०० रूपयांहून अधिक खर्च येत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे अलीकडेच ठिबकचा वापर वाढला संरक्षित सिंचनाच्या आधारे शेतकरी पिकांना जगवू लागला आहे. शेतकºयांना एकप्रकारे जीवणोपयोगी घटक महागल्याने अडचणीच्या काळातच त्यांच्यावर नाहक भुर्दंड बसला आहे.शासनाकडे कित्येक वर्षांपासून अनुदान प्रलंबितपाण्याचा प्रत्येक थेंब उपयोगी लावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कमी पाण्यात अधिकाधिक सिंचन व्हावे, यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. यासह जिल्ह्यासह राज्यात सूक्ष्म सिंचनाच्या योजना सुरू आहेत. सध्या केंद्र व राज्य शासनाकडून दोन हेक्टरपर्यंत ५५ हजारांचे अनुदान देण्यात येते. दोन हेक्टरवरील शेतकºयांना ४५ हजारांचे अनुदान देण्यात येते. मात्र शासनाकडून मिळणाºया या अनुदानासाठी शेतकºयांना वर्षानुवर्ष अनुदान रखडले आहे. परिणामी शेतकरी पदरचे पैसे खर्च करून संच बसवितात, मात्र त्यांना कित्येक वर्षे अनुदानाची प्रतीक्षा करावी लागते.