शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय महाचोराकडून १८ लाख ८१ हजारांचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 20:48 IST

दिवसाढवळ्या घरफोडी करण्यात तरबेज किशोर तेजराव वायाळ (३५, रा. मेरा (बु.), ता. चिखली, जि. बुलडाणा) याच्याकडून पोलिसांनी तब्बल १८ लाख ८१ हजार ७०० रुपये किमतीचे ६०७ गॅ्रम सोने जप्त केले.

अमरावती -  दिवसाढवळ्या घरफोडी करण्यात तरबेज किशोर तेजराव वायाळ (३५, रा. मेरा (बु.), ता. चिखली, जि. बुलडाणा) याच्याकडून पोलिसांनी तब्बल १८ लाख ८१ हजार ७०० रुपये किमतीचे ६०७ गॅ्रम सोने जप्त केले. वर्षभरातील ही गुन्हे शाखेची सर्वात मोठी व धडाकेबाज कारवाई ठरली आहे. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

 काही महिन्यांपूर्वी अमरावतीत भरदिवसा घर व फ्लॅट फोडण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत होत्या. घरात कोणी नसल्याची खात्री केल्यानंतर किशोर व त्याचा साथीदार लहु दगडू धंदरे (रा. रोहणा, जि. बुलडाणा) हे मुद्देमाल चोरून नेत होते. या चोºयांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, गुन्हे शाखेचे कर्तबगार पीएसआय राम गितेंच्या पथकाने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात बारकाईने तपास केला आणि आरोपीला गजाआड करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. किशोरने पोलीस कोठडीदरम्यान बडनेरा, नांदगाव पेठ, गाडगेनगर, राजापेठ या ठाण्यांच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. त्याने चोरलेला मुद्देमाल बुलडाणा जिल्ह्यातील सराफा बाजारात विकला. तो मुद्देमाल बुलडाण्यातील मेरा (बु.) व देऊळगाव मही येथील सराफा व्यावसायिकांकडून उपनिरीक्षक राम गिते, हवालदार प्रेम वानखडे, विनय मोहोड, पोलीस नाईक अमर बघेल, अजय मिश्रा, दिनेश नांदे, राजू आप्पा, पोलीस शिपाई सुलतान, इमरान, संग्राम भोजने, विनोद गाडेकर, चालक अमोल व रौराळे जप्त केला. 

'इन्स्टंट' चोरीत माहीरकुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या घरात चोरी करणारे अनेक चोरटे आहेत. मात्र, किशोर व त्याचा साथीदार हे केवळ 'इन्स्टंट' म्हणजे काही वेळेकरिताच बंद असलेल्या घरांना लक्ष्य करायचे.  पाच ते सात मिनिटांत घर फोडून मुद्देमाल लंपास करण्यात त्यांचा हातखंडा होता.

२०० हून अधिक चोरीचे गुन्हे किशोर वायाळ हा अट्टल चोरटा असून, त्याने महाराष्ट्रातील सोलापूर, जालना, अकोला तसेच गुजरात, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातील अनेक शहरांमध्ये घरफोड्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

शहरात मध्यंतरी घरफोडी व चोरीचे गुन्हे वाढले होते. त्याअनुषंगाने बारकाईने व अभ्यासपूर्ण तपास करून गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. पोलीस पथकाची ही कामगिरी कौतुकास्पद आहे.  दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त, अमरावती

टॅग्स :Crimeगुन्हाAmravatiअमरावती