शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

अमरावती विभागातील १७५१ प्राथमिक दुग्धोत्पादक संस्था अवसायनात, १०२  कार्यरत, पुनरुज्जीवनाचे प्रयत्न शून्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 17:41 IST

विभागात १९८० नोंदणीकृत प्राथमिक दुग्धोत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या.  त्यापैकी आतापर्यंत १७५१ संस्था अवसायनात निघाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. १२७ संस्था बंद झाल्या आहेत, तर अवघ्या १०२ संस्था सुुस्थितीत कार्यरत आहेत.

- संदीप मानकर 

अमरावती :  विभागात १९८० नोंदणीकृत प्राथमिक दुग्धोत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या.  त्यापैकी आतापर्यंत १७५१ संस्था अवसायनात निघाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. १२७ संस्था बंद झाल्या आहेत, तर अवघ्या १०२ संस्था सुुस्थितीत कार्यरत आहेत. अवसायनात निघालेल्या या संस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी शासकीय दुग्धविकास यंत्रणा व विभागीय उपनिबंधकांकडून कुठलेही प्रयत्न झालेले नाहीत.एकीकडे नोंदणीकृत प्राथमिक दुग्धोत्पादक सहकारी संस्था बंद पडत आहेत. नोंदणीकृत सहकारी संस्था उद्देशाची पूर्तता करू शकत नसतील, तर त्या संस्था अवसायनात काढण्यात येतात. सदर संस्थांच्या पुनरुज्जीवनाकरिता अवसायकाकडून त्यासंबंधी प्रस्ताव व आॅडिट अहवाल सादर शासनाला सादर होतो. नोंदणीकृत संस्था बंद पडल्यास त्याची झिरो बॅलन्सशीट तयार करून नोंदणी किंवा नोंदणी क्रमांक रद्द करण्याचा अधिकार हा विभागीय उपनिबंधक (दुग्धोत्पादन) यांच्याकडे असतो. प्राथमिक दुग्धोत्पादन संस्था तात्पुरत्या स्वरूपात बंद असतात. संबंधित यंत्रणेला संस्थेने पत्रव्यवहार करून सहा महिने दूधपुरवठा नियमित केल्यास त्या पुन्हा सुरू होऊ शकतात, असे जिल्हा दुग्धविकास अधिकारी यांनी सांगितले. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये यासाठी फारसे प्रयत्नच झाले नसल्याचे अवसायनात गेलेल्या संस्थांच्या संख्येवरून दिसून येत आहे. 

अमरावती विभाग : दुग्धोत्पादक सहकारी संस्थांची जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा   नोंदणीकृत संस्था  कार्यरत संस्था  बंद संस्था  अवसायनातील संस्था              

अमरावती           ५२३                       ३८                  ०१              ४८४     अकोला       १७१                      १३                   ५४              १०४ वाशिम        १११                       ०४                    ११              ९६बुलडाणा      ५८०                      २२                    ५०              ५०८यवतमाळ     ५९५                      २५                     ११             ५५९ एकूण        १९८०                     १०२                    १२७          १७५१

संस्थेने नियमित दूध संकलन सुरू करून पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव आमच्याकडे सादर केल्यास ती संस्था पुन्हा सुरू करण्यात येते.-एस.पी. कांबळे,विभागीय उपनिबंधक दुग्ध, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती