शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
2
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
3
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
4
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
5
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
6
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
7
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
8
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
9
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
10
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
11
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
12
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
13
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
14
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
15
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
16
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
17
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
18
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
19
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
20
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

दोन वर्षांत ऑन ड्युटी 17 पोलीस मृत्युमुखी, अधिकारी अन् कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 20:12 IST

येथील ग्रामीण विभागातील एकूण 17 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. सन 2017-18 या दोन वर्षांच्या कालावधीतील पोलिसांच्या मृत्युप्रमाणाची ही आकडेवारी आहे.

चेतन घोगरेअमरावती : येथील ग्रामीण विभागातील एकूण 17 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्याचे दिसून येत आहे. सन 2017-18 या दोन वर्षांच्या कालावधीतील पोलिसांच्या मृत्युप्रमाणाची ही आकडेवारी आहे. अमरावती कल्याण शाखेच्या माहितीनुसार, दोन वर्षांत 17 पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. 

अमरावती ग्रामीण विभागातील पोलिसांच्या मृत्युबाबत सन 2017 मध्ये दोन मोटार वाहन अपघातात दोघांचा मृत्यू झाला, एक आत्महत्या, तर अल्पशा आजाराने चार अशा एकूण सात पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर, सन 2018 मधील आतापर्यंतच्या सात महिन्यांच्या कालावधीत 10 पोलीस कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. त्यामध्ये अल्पशा आजाराने तीन, मोटर वाहन चालवताना दोन, हृदयविकाराने एक, पाण्यात बुडून एक, तर दोघांनी आत्महत्या केल्या व एकाचा कर्तव्यावर मारहाणीत मृत्यू झाला. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस कल्याण निधीमधून, ज्या दिवशी मृत्युमुखी पडले, त्याच दिवशी त्यांच्या परिजनांना 12 हजारांची तत्काळ मदत देण्यात आली. दरम्यान, इतर लाभाशिवाय प्रत्येक कुटुंबातील एकजण अनुकंपा तत्त्वावर पोलीस विभागात नोकरीवर लावून घेतला जाईल, असे शासन परिपत्रकात नमूद आहे. 

अ‍ॅक्सिसच्याच खातेदारांसाठी ३० लाखांचा निधी अपघाती निधन झालेल्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पगारी खाते अ‍ॅक्सिस बँकेत आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना अशा प्रसंगासाठी ३० लाखांचा लाभ मिळतो, तसेच ओरिएन्टल इंश्यूरन्सकडून 10 लाखांपर्यंत मदत मिळते. गत चार वर्षांपासून सेवेत रुजू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना याच बँकेत खाते काढणे अनिवार्य आहे. त्यामुळे अशाप्रसंगी सदर कर्मचारी लाभार्थी होऊ शकेल. परंतु, सन 2012 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे बँक खाते इतर (स्टेट) बँकांमध्ये होते. अशा कर्मचाऱ्यांना सदर लाभ दिला जात नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांसाठी शासनाने वेगळी तरतूद का करू नये, असा सवालही काही पोलीस कर्मचारी करीत आहेत. आतापर्यंत संदीप राठोड यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांचा लाभ मिळाला, तर पवन जाधव या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना स्टेट बँकेकडून एक लाखांची मदत मिळाली आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नऊ लाखांची मदतचांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले संतोष मडावी यांचा कर्तव्यावर असताना झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यांना अमरावती ग्रामीण पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नऊ लाखांची मदत त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. कर्तव्य बजावत असताना पोलीस शिपाई संतोष मडावी हे मारहाणीत ठार झाले. त्यामुळे त्यांना शहिदाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव जिल्हा ग्रामीण पोलीस विभागातर्फे शासनाकडे पाठविण्यात आला आहे. - एम.एन. मकानदार, पोलीस उपअधीक्षक, अमरावती ग्रामीण

टॅग्स :PoliceपोलिसAmravatiअमरावतीPolice Stationपोलीस ठाणे