शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी १७ लाख शस्त्रक्रिया, तात्याराव लहानेंकडे जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 22:34 IST

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशनअंतर्गत येत्या १८ महिन्यांमध्ये राज्यातील १७ लाख रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

अमरावती : मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशनअंतर्गत येत्या १८ महिन्यांमध्ये राज्यातील १७ लाख रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मिशन यशस्वितेची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने या ध्येयवेड्या डॉक्टरांवर सोपविण्यात आली आहे.‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशन २०१९’ हे मिशन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने संयुक्तपणे राबवावे. हे मिशन १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत राहील व यात आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाची अतिरिक्त मदत घ्यावी, असे निर्देश शासनाचे उपसचिव सुरेंद्र चानकर यांनी दिले आहेत. देशात मोतीबिंदुमुळे येणाºया अंधत्वाची विकृती मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यात महाराष्ट्रातील वृद्ध नागरिकांमध्ये ही समस्या अधिक आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असला तरी समस्येवर पूर्णपणे नियंत्रण राखता आलेले नाही. त्या पार्श्वभूमिवर ऑगस्ट २०१९ पर्यंत महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतला आहे. या मिशनचे राज्यस्तरीय समन्वयक म्हणून डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभाग या मिशनसाठी नेत्र शल्यचिकित्सक, तंत्रज्ञ व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संस्था, सर्व डॉक्टर्स व इतर मनुष्यबळाने मिशन समन्यवकांना संपूर्ण सहकार्य करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांचा संकल्पमहाराष्टlत मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये जवळपास १७ लाखांचा अनुशेष आहे. यातील सुमारे पाच लाख मोतीबिंदू हे परिपक्वहोऊन गेले असून त्यातील बहुतेक जण वृद्ध व ग्रामीण भागातील आहेत. आरोग्याच्या योजनांचा आढावा घेताना ही बाब लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्धपातळीवर ‘मोतीबिंदू’मुक्त महाराष्टची योजना आखण्यास सांगितले होते. त्यानुसार या संकल्प यज्ञात १७ लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतील. मोफत चष्मे वाटपही होईल.