शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल फायनलपूर्वी मोठी बातमी! दोन्ही संघांचे दोन महत्वाचे खेळाडू अनफिट; आणखी एक खेळाडू... 
2
“राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले
3
IPL 2025 Final: RCB की PBKS? पाऊस पडला तर कुणाचं स्वप्न जाईल 'पाण्यात'? नियमात स्पष्ट म्हटलंय की...
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन!
5
खळबळजनक! लेकाला हवी होती BMW; वडिलांनी दुसरी कार घेताच तरुणाने संपवलं जीवन
6
युक्रेनला हवे होते तेच रशियाने केले! एक हल्ला होताच विमाने ४०००-५५०० किमी आत नेऊन ठेवली, अन्...
7
“तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, बाळासाहेबांनी...”; राऊतांची भाजपावर टीका
8
आग लगने वाली है! 'धुरंधर' सेटवरील रणवीर अन् संजूबाबाचा व्हिडिओ लीक; चाहत्यांना आठवला 'खिलजी'
9
भारत आणि रशियाच्या मैत्रीने अमेरिकेला जळजळ; शस्त्रे खरेदीवर ट्रम्प सरकारने घेतला आक्षेप
10
इवल्याशा पक्ष्याच्या धडकेमुळे महाकाय विमानाला भगदाड कसं पडलं? असं आहे त्यामागचं कारण
11
परेश रावल यांची खंत, 'हेरा फेरी ३'मधून साइडलाइन केल्यामुळे घेतली एक्झिट?, म्हणाले - "मी तर हिरो होतो..."
12
Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?
13
Mumbai Suicide: आरसीटी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी, ३८ वर्षीय व्यक्तीच्या मृत्युने परिसरात खळबळ
14
एसबीआय, पीएनबी, बीओबीसब ५ सरकारी बँका बनवणार एकत्रित कंपनी, काय आहे प्लान?
15
थायलंड फिरून परतला, पण एकटा नाही...! तरुणाची बॅग उघडताच मुंबई विमानतळावर सगळ्यांनाच बसला धक्का
16
ज्याला कष्टानं बनवलं, आता तोच खातोय नोकरी! मायक्रोसॉफ्टमध्ये दुसऱ्यांदा मोठी नोकरकपात
17
कमल हासन यांच्या कन्नड-तमिळ भाषेबाबत केलेल्या वक्तव्याने वाद; हायकोर्टाने फटकारले...
18
अदानी समूहाची अमेरिकेत पुन्हा चौकशी? आज सर्वच शेअर्समध्ये घसरण; काय म्हटलंय कंपनीनं?
19
अयोध्या राम मंदिर: ८ देवळांमध्ये प्राणप्रतिष्ठा, १२ तास सलग विधी; ५ जूनला राम दरबार भरणार!
20
Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

गर्भधारणेचा मानसिक धक्का सहन न झाल्याने १६ वर्षीय मुलीची आत्महत्या, आरोपी अल्पवयीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:08 IST

Amravati : १७ वर्षीय मुलाविरुद्ध बलात्कार, पोक्सोचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील १६ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघड झाली. एका १७ वर्षीय मुलाने तिच्यावर शारीरिक बळजबरी केली. त्यातून तिला गर्भधारणा झाली. त्यामुळेच तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने नोंदविली. त्याआधारे गाडगेनगर पोलिसांनी दि. २९ मे रोजी रात्री संबंधित विधिसंघर्षित बालकाविरुद्ध बलात्कार, पोक्सो व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. तो बालक मृत मुलीच्या व तिच्या कुटुंबीयांच्या परिचित आहे. 

तक्रारीनुसार, मुलगी व १७ वर्षीय मुलाचे अलीकडे वादविवाद सुरू होते. दि. २८ मे रोजी रात्री ८ वाजता मुलीची आई कॅटरिंगच्या कामासाठी एका लॉनमध्ये होती. त्यावेळी मुलीने तिच्या आईला फोन केला व सांगितले की, मला त्या मुलाच्या आईने तिच्या घरी बोलावले आहे. त्यामुळे मी तिथे जात आहे. काही वेळानंतर घरातील बाथरूममध्ये मुलगी गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. दि. २९ मे रोजी तिचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात ती एक महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.

अशी आहे तक्रारमृत मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार, तो अल्पवयीन मुलगा त्यांच्या मुलीला जबरदस्तीने त्याच्यासोबत बोलायला लावायचा तसेच शारीरिक संबंध करण्यासाठी दबाव टाकत होता. यातूनच त्याने शारीरिक संबंध ठेवले व मुलीला गर्भधारणा झाली. गर्भधारणा झाल्यामुळेच मुलीने आत्महत्या केली. मृत मुलीच्या पालकांनी काही दिवसांपूर्वीच त्या मुलाला समजदेखील दिली होती.

टॅग्स :Amravatiअमरावती