राज्यात आरएफओंची १५२ पदे रिक्त; वन्यजीव विभागाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 07:42 PM2020-04-26T19:42:37+5:302020-04-26T19:45:22+5:30

राज्याच्या वन विभागात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची वर्षभरापासून १५२ पदे रिक्त आहेत. तर, वन्यजीव विर्भातगातील १९ पदे असल्याने वनविर्भातगाच्या कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. परिणामी वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

152 vacancies for RFOs in the state; Ignoring the wildlife department | राज्यात आरएफओंची १५२ पदे रिक्त; वन्यजीव विभागाकडे दुर्लक्ष

राज्यात आरएफओंची १५२ पदे रिक्त; वन्यजीव विभागाकडे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देवर्षभरापासून प्रभारीवर कारभार


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्याच्या वन विभागात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची वर्षभरापासून १५२ पदे रिक्त आहेत. तर, वन्यजीव विर्भातगातील १९ पदे असल्याने वनविर्भातगाच्या कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. परिणामी वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही वर्षांपासून आयएफएस लॉबी राज्य वनसेवेतील पदोन्नतीबाबत बैठक घेत नसल्याने वन विभागात रिक्त पदांचा आलेख वाढत आहे. वन विभागातील वनपरिक्षेत्राधिकारी हे पद अत्ंयत महत्त्वाचे आणि कार्यकारी पद असताना या पदाला न्याय मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आयएफएस लॉबी स्तरावरून पदोन्नतीसाठी वर्षभरात बैठकी घेऊन रिक्त पदे राहणार नाहीत, याची दक्षता घेताना दिसून येत नाही. बदली धोरणानुसार अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी बदलीस पात्र १७९ आरएफओंची यादी तयार करून वनमंत्री संजय राठोड यांना सादर केलेली आहे. दुसरीकडे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची १५२ पदे रिक्त असताना ही पदे त्वरित भरण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नसल्याचे वास्तव आहे. आरएफओंच्या रिक्त पदांमध्ये विदर्भात सर्वाधिक जागा आहेत. वन्यजीव विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे ठेवण्यात आले असून, वन्यजीवांचे संरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमरावती वनवृत्तात सप्टेंबर २०१९ नंतर १६ वनपालांना आरएफओपदी बढती मिळाली. त्यानंतर मुख्य वनसंरक्षकांनी गत आठ महिन्यांपासून वनपालांची पदे रिक्त ठेवल्याची माहिती आहे.

विभागनिहाय रिक्त पदे
नागपूर- ३३, अमरावती - २६, औरंगाबाद- १७, नाशिक- २५, कोकण- २१, पुणे - ३०

बदलीसाठी १० पसंतीक्रम
वनविभागात बदलीस पात्र अधिकाऱ्यांना १० जागांसाठी पसंतीक्रम ठेवण्यात आला आहे. यात वनविभाग (प्रादेशिक), वन्यजीव विर्भातग, सामाजिक वनीकरण व कार्य आयोजना, रोहयो अशा शाखेत प्रत्येकी तीन वर्षांनी बदलीचे धोरण आहे. यवतमाळ व नागपूर वनवृत्तात काही आरएफओ ४ वर्षांचा कालावधी पार करूनही त्याच ठिकाणी कायम आहेत.

सहायक वनसंरक्षकांच्या बढतीला ब्रेक
वनविभागात सहायक वनसंरक्षक हे पद विनाकामाचे पद मानले जाते. या पदावर काही वनाधिकरी विभागीय वनाधिकाऱ्यांयांच्या बढतीच्या मार्गावर आहेत. सहायक वनसंरक्षकांची ३४ पदे रिक्त असताना आरएफओ ते सहायक वनसंरक्षकपदाच्या बढतीसाठी अद्यापही समितीची बैठक झालेली नाही. आयएफएस लॉबीच्या संथ कारभारामुळे आरएफओ, एसीएफ यांना बढती मिळालेली नाही.

Web Title: 152 vacancies for RFOs in the state; Ignoring the wildlife department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.