शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

टिनएजर लव्ह; प्रेम, बलात्कार अन् गर्भधारणा, वैद्यकीय तपासणीनंतर उघड झाले वास्तव

By प्रदीप भाकरे | Updated: February 14, 2023 17:42 IST

बलात्कार व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल

अमरावती : एका १५ वर्षे ९ महिने वयाच्या शाळकरी मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला प्रेमजाळ्यात ओढण्यात आले. पुढे तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला. त्यातून तिला गर्भधारणा झाल्याची धक्कादायक बाब येथील खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली.

याप्रकरणी, खोलापुरी गेट पोलिसांनी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आरोपी अविनाश राऊत (१९, रसुलपूर) याच्याविरूद्ध बलात्कार व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. वैद्यकीय तपासणीनंतर ही बाब उघड झाली. तक्रारीनुसार, आरोपी व पिडित मुलीची मागील वर्षभरापासून मैत्री आहे. त्यातून पुढे त्यांच्यात प्रेमसुत जुळले. दोघांमध्ये सोशल मिडियावरून संवाद वाढला. दोघांचे फोनवरून बोलणे सुरू झाले. पुढे प्रेमालाप अधिकच वाढला. अशातच, नोव्हेंबर २०२२ मध्ये पिडिताची आई घराबाहेर गेली असताना पिडिता ही एकटीच होती. त्यावेळी आरोपी तिच्या घरात शिरला. आपण लग्न करू या, अशी बतावणी करून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

असे फुटले बिंग

त्या घटनेनंतर पिडित मुलीला स्वत:त शारीरीक बदल जाणवायला लागले. दोन तीन दिवसांपुर्वी तिच्या पोटात दुखू लागल्याने तिने ती बाब आईला सांगितली. तिची आई तिला स्थानिक पीडीएमसी दवाखान्यात घेऊन गेली. तेथे तपासणीअंती ती अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. ते ऐकून पीडितासह तिच्या आईच्या पायाखालची वाळू सरकली. ही बाब गाडगेनगर पोलीस ठाणे व बालकल्याण समितीला कळविण्यात आली. पोलीस उपनिरिक्षक महिलेने तिचे बयाण नोंदवून घेतले. त्यानुसार ती १५ वर्षे ९ महिने वयाची आहे. आरोपीने तिच्याशी केलेल्या कुकृत्याची पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली.

संबंधित अल्पवयीन मुलीच्या बयाणावरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. तिने आपल्या बयानात संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. आरोपीला तातडीने अटक करण्यात आली.

- गजानन तामटे, ठाणेदार, खोलापुरी गेट 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती