मोहन राऊत - अमरावती
‘
मागेल त्याला काम’ या शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २ हजार ५४१ कामांवर १ लाख ५0 हजार ९५५ मजूर राबत आहेत. या रोहयोच्या कामात धारणी, चिखलदरा, चांदूरबाजार या तालुक्यांनी बाजी मारली, तर धामणगाव रेल्वे, भातकुली, नांदगाव खंडेश्वर हे तालुके माघारले आहेत. जिल्ह्यात
रोजगार हमी योजनेच्या कामांचा उत्तरार्ध उन्हाळ्यात युध्दस्तरावर सुरू आहे. ही कामे अधिक वेगाने व्हावी म्हणून जिल्हा प्रशासन याकडे बारकाईने लक्ष ठेवत आहे. सिंचन विहिरी, वैयक्तिक शौचालय, गांडुळ खत, कुक्कुट पालन शेड, शेळी शेड, जनावरांचा गोठा, गांडूळ खत युनिट, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत विविध कामे, तलावातील गाळ काढणे, वृक्ष लागवड, धाडीचे बांध आदी कामे अधिक वेगाने सुरू आहेत. अन्यथा
तहसीलदार-बीडीओंना कारणे
दाखवा नोटीस पावसाळा
सुरू होण्यापूर्वी रोजगार हमी योजनेची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ज्या तालुक्यात कामाची गती मंदावली आहे त्या तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस आगामी काळात बजावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल या कामाची माहिती घेऊन पुढील पाऊल उचलणार आहेत.