शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

अमरावती जिल्ह्यात १४ व्या शतकातील महिमापूरची देखणी पायविहीर दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 12:43 IST

आश्चर्याने तोंडात बोटे जावीत अशी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली, औरस-चौरस भव्य ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या इवल्याशा गावात १४ व्या शतकापासून आजही दिमाखात उभी आहे.

ठळक मुद्देस्थापत्यकलेचा अप्रतिम नमुनाराज्याच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत स्थान

गणेश देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: आश्चर्याने तोंडात बोटे जावीत अशी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली, औरस-चौरस भव्य ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या इवल्याशा गावात १४ व्या शतकापासून आजही दिमाखात उभी आहे. तथापि, महाराष्ट्र राज्याची संपत्ती आणि अमरावती जिल्ह्याचे वैभव असलेल्या या विहिरीकडे शासनाने सातत्याने केलेले दुर्लक्षही विहिरीइतकेच आश्चर्यकारक आहे.

अशी आहे रचनासंपूर्ण बांधकाम दगडाचे. आकार चौकोनी. खोली ८० फूट. रुंदी ४० मीटर बाय २५ मीटर. विहिरीत उतरण्यासाठी ८५ प्रशस्त पायऱ्या. पायऱ्यांच्या मार्गावर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमान कमानी. प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली दोन लक्षवेधी पुष्पे. पायऱ्यांमध्ये क्षणिक विसाव्यासाठी टप्पे. आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल, बसता येईल अशी व्यवस्था. बांधकाम संपल्यावर तळाशी चहुबाजूंनी ओट्यासमान रचना. आतमध्ये दोन कोरीव ध्यानस्थ मूर्ती.विहिरीचा इतिहास

१४४६ ते १५९० या १४४ वर्षांच्या कालखंडात बहामणी साम्राज्याच्या पाच पातशाही होत्या. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदीलशाही, हैदराबादची कुतूबशाही, बिदरची बरीदशाही आणि अचलपूरची इमादशाही, अशा त्या पाच पातशाही होत. अचलपूरच्या इमादशाहीचे संस्थापक फते इमाद उल मुल्क हे होते. फते इमाद उल मुल्क यांनी आरंभीच्या काळात भरमसाठ बांधकामे केलीत. ठळक बांधकामात चिखलदऱ्यातील दोन मशिदी, गाविलगड किल्ल्याचा परकोट, परतवाड्यातील हौद कटोरा ही उदाहरणे देता येतील. महिमापूरची विहीरही त्याच काळातील, असल्याचा निष्कर्ष इतिहास संशोधक अनिरुद्ध पाटील यांनी ठामपणे व्यक्त केला.या रचना कालौघात नष्टजमिनीपासून तीन-चार फूट उंचीपासून विहिरीच्या तळापर्यंतचे बांधकाम आजघडीला बघता येत असले तरी त्याशिवाय कालौघात नष्ट झालेली इतर अनेक वैशिष्ट्ये या विहिरीत होती, हे 'लोकमत'च्या शोधमोहिमेतून पुढे आले. पूर्वी या विहिरीवर दोन मजल्यांचे बांधकाम होते. पाहणाऱ्याला ही विहीर असल्याचे लक्षातच येणार नाही, अशी त्या बांधकामाची रचना होती. ते प्रमुख वैशिष्ट्यही होते. वरील दोन मजले पडल्यामुळे आता विहिरीच्या आतील बांधकाम वरून बघता येते. या विहिरीच्या आत आजदेखील कपाऱ्यांसमान भासणारी गूढ रचना आहे. कपारींचे गूढ काय, याबाबत जाणकारांमध्ये खल होत राहतो. 'लोकमत'च्या माहितीनुसार, कपारी म्हणजे मुळात विहिरीत वास्तव्य करण्यासाठीचे कक्ष होते. वास्तव्यासाठी आवश्यक ती रचना त्या कक्षांमध्ये उभारण्यात आली होती. ती नष्ट झाल्यामुळे शिल्लक बांधकाम कपाऱ्यांप्रमाणे दिसते.

विकासासाठी पाठपुरावा - रमेश बुंदिलेमहिमापूरची विहीर हे राज्याचे वैभव आहे. विहिरीच्या विकासासाठी अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे आणि पर्यटनमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला. माझ्या निधीतून अमरावती, निरुळगंगामाई, महिमापूर आणि पुढे दर्यापूरच्या मुख्य मार्गाला जोडणारा रस्ता मंजूर करवून घेतला. त्यावरील पूलही मंजूर झाला. या स्थळाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशीही पत्रव्यवहार करणार आहे, अशी माहिती दर्यापूरचे आमदार रमेश बुंदिले यांनी दिली

विकासासाठी प्रयत्न करणार - नितीन गोंडाणेमहिमापूरबाबत मीदेखील ऐकले आहे. पर्यटनस्थळाच्या 'क' दर्जाबाबत माहिती नव्हती. माहिती घेऊन अधिकाधि

क निधी देण्याचे आणि पर्यटक आकर्षित होतील असा विकास करण्यासाठी प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी दिली.

टॅग्स :Governmentसरकार