शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

१४८ कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पाला 'स्टे'; नव्याने २७२ कोटींचा डीपीआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 14:40 IST

बडनेरा मतदारसंघातील कामे : मनपाचा नगरविकासला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : तब्बल १४७ कोटी ७५ लाख रुपये किमतीच्या अमरावती शहराच्या रस्ते विकास प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेस नगरविकास विभागाने १ जुलै रोजी काढलेल्या शासननिर्णयानुसार स्थगिती दिली होती. त्याचदिवशीच्या पत्राने नगरविकास विभागाने आमदार रवि राणा यांच्या पत्रातील कामांचा समावेश करून नव्याने डीपीआर पाठविण्याची सुचना अमरावती महापालिकेला केली होती.

त्यानुसार, महापालिकेच्या बांधकाम विभागाने सुधारित २७२ कोटी रुपयांच्या अमरावती रस्ते विकास प्रकल्पाचा डीपीआर (सर्वंकष प्रकल्प अहवाल) नगरविकास विभागाला पाठविला आहे. नगरविकास विभागाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर त्या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेस सुरूवात केली जाणार आहे.

१ जुलै रोजी आ. रवि राणा यांनी दिलेल्या यादीमधील रस्ते व नाल्यांचे बांधकामाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) संपूर्ण नकाशे सर्वेक्षणासह नगरविकास विभागाला पाठविण्यापूर्वी त्यास महापालिकेतील सहायक संचालक नगररचना व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांची प्राथमिक तांत्रिक मान्यता घ्यावी, असे निर्देशित केले होते. त्यानुसार, महापालिकेच्या बांधकाम विभागाने नुकताच तो डीपीआर नगरविकास विभागाला पाठविला आहे. त्यानुसार, बडनेरा मतदारसंघातील १३ रस्त्यांचे कॉक्रीटिकरण, पेवर ब्लॉक व नाल्यांचे बांधकाम होणार आहे.

उडाली होती खळबळशासनाने ११ मार्चच्या जीआरअन्वये नगरोत्थान महाभियानांतर्गत रस्ते विकास प्रकल्प मंजूर केला होता. १ जुलै रोजी त्याला स्टे देण्यात आला. विशेष म्हणजे ते देताना कारण नमूद न केल्याने विकास प्रकल्पास स्थगिती देण्याचे कारण तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आता नगरविकास विभागानेच राणा यांच्या पत्राचा संदर्भ दिला. त्यामुळे त्यातील राजकारण देखील स्पष्ट झाले आहे.

पत्र १० चे, प्रशासकीय विषय ४ लाच !राणा यांनी सुचविलेल्या पत्रावर महापालिकेकडून डीपीआर बोलावण्याचे नगरविकासचे पत्र १० जुलै रोजीचे असल्याचा संदर्भ आहे. तर दुसरीकडे त्यांनी सुचविलेल्या कामांना, डीपीआर बनविण्यासाठी पीएमसी म्हणून नियुक्तीस मंजुरी देण्यास त्याआधीच ४ जुलै रोजीच्या प्रशासकीय विषयाने मान्यता दिल्याचे दिसून आले. मात्र, नगरविकास विभागाचे ते पत्र १० जुलैचे नसून १ जुलैचे आहे. त्या अनावधानाने १० जुलै असे दर्शविण्यात आल्याचे स्पष्टीकरण सहायक अभियंता अजय विचुरकर यांनी दिले.

"राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिवांच्या १ जुलै रोजीच्या पत्रानुसार, आ. रवि राणा यांनी दिलेल्या यादीमधील रस्ते व नाल्यांच्या बांधकामाचा सुमारे २७२ कोटींचा डीपीआर नव्याने पाठविण्यात आला आहे. नगरविकास विभागाच्या प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे. ते पत्र १० जुलैचे नसून १ जुलैचे आहे. टिप्पणीमध्ये दिनांकाबाबत चूक झाली. ती दुरुस्त करण्यात आली." -रवींद्र पवार, कार्यकारी अभियंता 

टॅग्स :AmravatiअमरावतीGovernmentसरकार