शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात तक्रार देतो म्हणून उकळले १४ लाख रुपये, महिलेसह दोघांविरूध्द खंडणीचा गुन्हा

By प्रदीप भाकरे | Updated: October 6, 2023 18:55 IST

स्टॅंप पेपर फाडला, २ लाख रुपये लांबविले

अमरावती: पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी देऊन येथील एका व्यक्तीकडून १२.६० लाख रुपये उकळण्यात आले. ती महिला तेवढ्यावरच न थांबता ती त्याच्याकडील २ लाख ९ हजार ५०० रुपये रोख, आधार व पॅनकार्ड घेऊन पोबारा झाली. ४ ऑक्टोबरपुर्वी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हददीत हा प्रकार घडला. याप्रकरणी, राजापेठ पोलिसांनी ओंकार नामक फिर्यादीच्या तक्रारीवरून ५ ऑक्टोबर रोजी एक महिला व तिच्या नातेवाईकाविरूध्द खंडणी, मारहाण, धमकीचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, फिर्यादी ओंकार नामक व्यक्तीची आरोपी महिलेसोबत एक वर्षापुर्वी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी व फिर्यादी हे एकमेकांना भेटत होते. ती फिर्यादी यांच्या कार्यालयात येत होती. आरोपी महिलेने वेळोवेळी फिर्यादी ओंकार यांना पैशाची मागणी केली. दिले नाही तर पोलीस स्टेशनला जावुन तक्रार देतो, अशी धमकी दिली. त्यामुळे तिने यापुर्वी त्यांच्याकडून पाच लाख रूपये तसेच वेळोवेळी एकुण १२ लाख ६० हजार रूपये उकळले. दरम्यान ४ ऑक्टोबरपुर्वी आरोपी महिलेने ओंकार यांना पुन्हा दोन लाख रूपयांची मागणी केली होती. नाहीतर पोलीस स्टेशनला जावुन तक्रार देतो, अशी धमकी दिली. 

स्टॅम्प पेपर फाडलादरम्यान, फिर्यादीला तो ससेमिरा कायमचा टाळायचा होता. त्यामुळे दोन लाख रुपये घे व स्टॅम्पवर सही करून दे, यानंतर मला ब्लॅकमेलिंग करू नको. असे ओंकार यांनी तिला बजावले. दरम्यान ४ ऑक्टोबरपुर्वी ओंकार हे २ लाख रुपये व स्टॅम्पपेपर घेऊन राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी गेले. त्यावेळी महिला आरोपीने स्टॅम्प पेपर फाडला. तसेच ओंकार यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील दोन लाख रूपये, ९५०० रुपये रोख असलेले वॉलेट, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, असे महत्वाचे कागदपत्र घेऊन ती रफुचक्कर झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीAmravatiअमरावतीPoliceपोलिस