शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती येथील मुख्य वनसंरक्षकांच्या बंगल्यावर १४ वनमजूर; थेट मुख्य सचिवांकडे तक्रार!

By गणेश वासनिक | Updated: June 17, 2025 12:59 IST

वरिष्ठांकडून तक्रारीची चाचपणी सुरू : तक्रारकर्ता म्हणतात, तो मी नव्हेच

गणेश वासनिक  अमरावती :अमरावती वन विभाग (प्रादेशिक)च्या मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांच्या बंगल्यावर एक, दोन नव्हे तर तब्बल १४ वनमजूर दिमतीला असल्याची तक्रार थेट मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आली आहे. या नियमबाह्य कारनाम्याची चौकशी व्हावी, यासाठी एका विधिज्ञांच्या नावाचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र या तक्रारीशी आपला काहीही संबंध नाही. आपल्या नावाचा वापर करून कोणीतरी मुख्य सचिवांकडे तक्रार केल्याचे ‘त्या’ विधिज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही तक्रार खरी की खोटी? याचा शोध आता वन विभाग घेत आहे.

वन विभागाचा कारभार हा ब्रिटिशकालीन असाच असतो. याचा प्रत्यय अनेकदा बड्या वनाधिकाऱ्यांच्या वागणुकीतून अनुभवता येतो. मग मुख्य वनसंरक्षक असो वा क्षेत्र संचालक, वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी, सहायक वनसंरक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे वनमजूर हा त्यांचा घरगडी म्हणून दिमतीला असतो. यात प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण, कार्य आयोजना या उपविभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, सीसीएफ जयोती बॅनर्जी यांच्या बंगल्यांवर १४ वनमजूर कार्यरत असल्याची तक्रार नेमकी काेणी, का केली? याचा शोध घेतला जात आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने अमरावती वन विभागातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. अमरावती येथील ॲड. मनीष देशमुख हे तक्रारदार असून, सीसीएफ बॅनर्जी यांच्या बंगल्यावर १४ वनमजूर नियमबाह्य दिमतीला असल्याचे पत्र थेट राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती वन विभागातील ‘टॉप टू बॉटम’ अधिकारी धास्तावले आहेत. यासंदर्भात सीसीएफ जयोती बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत. 

सहायक वनसंरक्षकांना नियमबाह्य बंगला कोणी दिला?मोर्शी येथील सहायक वनसंरक्षक डॉ. मयूर भैलुमे यांना गत काही महिन्यांपूर्वी अमरावती येथील सामाजिक वनीकरणाचे वनसंरक्षकांचा नियमबाह्य बंगला देण्यात आला आहे. एसीएफ आणि सीएफ या दोन संवर्गातील पदांमध्ये मोठी तफावत असताना वरिष्ठांनी हा निर्णय कोणाच्या आदेशाने घेतला, याचा शोध घेणे आवश्यक आहे. एसीएफ डॉ. भैलुमे यांचे मुख्यालय मोर्शी असूनही ते अमरावतीतून कारभार हाकतात, याकडे वरिष्ठ लक्ष देणार की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

"मुख्य वनसंरक्षकाच्या बंगल्यात वनमजूर असल्याबाबतच्या तक्रारीशी काहीही संबंध नाही. मला तर पहिल्यांदाच कळाले की माझ्या नावाचा वापर करून कोणीतरी मुख्य सचिवांकडे तक्रार दिली आहे."- ॲड. मनीष देशमुख, अमरावती

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावती