शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

८३९ ग्रामपंचायतींमध्ये वर्षभरात १३६९ दूषित पाणी नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:02 IST

जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींतर्गत १६८७ गावांतील आरोग्य यंत्रणनेने या वर्षात तपासलेल्या १८५६५ पाणीनमुन्यांपैकी १३६७ पाणीनमुने दूषित आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देआरोग्याला धोका : १५० दूषित नमुने अमरावतीत

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींतर्गत १६८७ गावांतील आरोग्य यंत्रणनेने या वर्षात तपासलेल्या १८५६५ पाणीनमुन्यांपैकी १३६७ पाणीनमुने दूषित आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.दूषित पाणी पिल्याने जलजन्य आजार होत असून १ एप्रिल २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ दरम्यान, सदर पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले होते. त्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले यांना सादर करण्यात आला.दूषित पाणी नमुने आढळल्याची सरासरी टक्केवारी ७.३७ एवढी आहे. तर २५१९ ब्लिचिंग पावडर नमुनेसुद्धा घेण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण यंत्रणेफार्मत १६८७ गावांतील जानेवारी महिन्यांत ८३९ पाणी नमुने घेण्यात आले. यामध्ये ११५ पाणीनमुने दूषित आढळले. या पाणी नमुन्यांमध्ये सार्वधिक दूषित नमुने १६५ अमरावती तालुक्यातील आहेत. १५० चिखलदार तालुक्यात, १३४ अचलपुरमध्ये, तर सर्वात कमी २१ चांदूररेल्वे तालुक्यात आढळले आहेत. साधारणत: पावसाळ्यात सार्वधिक दूषित पाणी नमुने आढळतात. पिण्याच्या पाण्यात कॉलीफॉर्म नावाचा बॅक्टेरीया आढळला तर याला दूषित पाणी मानला जातो. हा बॅक्टेरीयाच विविध जलजन्य आजाराला कारणीभूत ठरत असून दूषित पाणी वारंवार पिल्याने टायफाईड, कावीळ, गॅस्ट्रो (अतिसार), कॉलरा आजार होतात. म्हणून जिल्हा आरोग्य ग्रामीण यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या पाणीपुरवठा योजनेतून किंवा बोरवेल वरून नागरिकांना पिण्याकरिता पाणीपुरवठा करण्यात येतो ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही? याची तपासणी केल्यानंतर पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांची आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत खासगीत आलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.जलजन्य आजाराची २१६ जणांना लागणदूषित पाण्यामुळे कावीळ, टायफाईड, कॉलरा असे आजार कारणीभूत ठरत असून, तालुकानिहाय प्राप्त झालेल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार वर्षभरात चांदूर रेल्वे तालुक्यात कॉलरा गॅस्ट्रोचे ४४ जणांना लागण झाली होती. तिवसा तालुक्यात गॅस्ट्रोचे १०, वरूडमध्ये ४२, मोर्शीत २३, चिखलदार येथे ९६ असे एकूण २१६ जणांना जलजन्य आजाराची लागण झाली होती. तापाने धामणगाव तालुक्यातील एका रुग्णाचा, अतिसाराने तिवसा येथील एकाचा, तर गॅस्ट्रोने मोर्शी तालुक्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्याकारणाने मृत्यूलाही कारणीभूत ठरणारे व दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजाराकडे दुर्लक्षित करून चालणार नाही, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असलेल्या ठिकाणी दर तीन महिन्यांत पाणी नमुने तपासणी करण्यात येते. पहिल्यांदा पाणीनमुने दूषित आढळल्यास तेथे सुपरक्लोरिनेशन करण्यात येते.- सुरेश असोले. जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती.