लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जगात वाघांच्या संख्येत भारत अव्वल स्थानी असला, तरी व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांच्या संवर्धनासाठी फारशा उपाययोजना होताना दिसत नाहीत. देशात २०१२ ते २०२४ यादरम्यान १३५० ताांचा मृत्यू झाला असून, यात ५० टक्के मृत्यू हे प्रकल्पाबाहेरील असल्याची नोंद राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडे आहे. देशातील ५८ व्याघ्र प्रकल्पांमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाघांच्या संख्येमुळे प्रकल्पाच्या सीमा कमी पडू लागल्या. परिणामी प्रकल्पाबाहेर वाघांचा मुक्त संचार अलीकडे सर्वसाधारण झाला आहे. त्यातूनच मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
राज्यात ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा, पेंच, मेळघाट, बोर व सह्याद्री, असे सहा व्याघ्घ्र प्रकल्प आहेत. तर ४८ अभयारण्ये असून, ४ संवर्धन राखीव क्षेत्र आहेत. व्याघ्र प्रकल्पात जागा अपुरी पडत असल्याने वाघांनी नवा कॉरिडॉर शोधला असून, नजीकच्या राखीव क्षेत्रात मुक्काम चालविला आहे. एकट्या विदर्भात ३० वाघांचा राखीव क्षेत्रात मुक्त संचार आहे. वाघांच्या सुरक्षिततेसाठी रक्षकांची नियमित गस्त, मॉनिटरिंग सुरूच असते, अशी माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आदर्श रेड्डी यांनी दिली.
सर्वाधिक मृत्यू कुठे ?मध्य प्रदेश - ३५५महाराष्ट्र - २६१कर्नाटक - १७९उत्तराखंड - १३२तामिळनाडू - ८९आसाम - ८५केरळ - ७६उत्तर प्रदेश - ६७राजस्थान - ३६बिहार - २२आंध्र प्रदेश - १४प. बंगाल - १३ओडिशा - १३गोवा - ४नागालैंड, दिल्ली - प्रत्येकी २